श्रीरामपूर (प्रतिनिधी)
गुरुवार दि. १२ फेब्रुवारी पासून येथील थत्ते मैदानात सुरू झालेल्या दैनिक सार्वमत शॉपिंग एक्स्पो २०२६ ला काल शुक्रवारी दुसऱ्या दिवशी तालुक्यातील व शहरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. अनेक मान्यवरांनी एक्स्पोला सदिच्छा भेट देऊन खरेदी केली. यानिमित आयोजित लहान गटातील ‘सोलो डान्स’ला बालकलाकारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
शॉपिग एक्स्पोचे आयोजन करण्याचे दैनिक सार्वमतचे हे सहावे वर्ष आहे. काल दुसन्या दिवशी ग्राहकांनी या खरेदी महोत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. या महोत्सवासाठी मुख्य प्रायोजक म्हणून श्री ईम्पेक्ल द फर्निचर मॉल, श्रीरामपुर असून सहप्रायोजक साई आदर्श मल्टीस्टेट, राहुरी फॅक्टरी हे आहेत
काल सायंकाळी स्थानिक विद्याथ्यांना हक्काचे व्यासपीठ मिळावे, म्हणून सोलो डान्सचे आयोजन करण्यात आले होते, यामध्ये शहर व परिसरातील बालकलाकारांनी सहभाग घेतला. त्यांनी सादर केलेल्या कलाविष्काराला रसिक प्रेक्षकांनी चांगलीच दाद दिली.
सोलो डान्समध्ये आर्वी गौरव चौधरी, गावीं गौरव चौधरी, ओंकार बद्रीनारायण वहणे, ऋतुराज बाळासाहेब निर्मळ, अस्मिता प्रशांत मोरे, फलक शफी शेख, अक्षरा मनोज बढणे, अनन्य मनोज बढ़णे, दर्शन वाघ, पार्थ मुळे, वेदांत दरेकर, श्रेयश दरेकर, अंश मुळे, अंजली भारत, बरद कहाते, स्वरा गायकवाड, प्राची निंबाळकर, श्रेया काळे, नंदिनी पुरिया, वैष्णवी धुरिया, शिवन्या अंभोरे, आज्ञा चौधरी, साई सोनवणे, गौरी नानासाहेब बादव, ज्ञानेश्वरी बजरंग यादव, नाविन्या त्रिभुवन, तसेच बाल शाहीर ओवी काळे, मनवा घोरपडे आदी बालकलाकारंनी नृत्त्याविष्कार सादर केला. उपस्थित प्रेक्षकांनी त्यास मनमुराद दाद दिली.
सहभागी सर्व कलाकारांना नटराज बुक स्टालच्या वतीने भेटवस्तू तर दैनिक सार्वगतच्या बतीने प्रशस्तीपत्रक देण्यात आले. नटराज बुक स्टॉलचे संचालक संदीप सुमनलाल शहा व श्रीमती स्वात्ती सुमनलाल शहा यांच्या हस्ते ही बक्षिसे देण्यात आली. श्रीरामपूर येथील थत्ते मैदानावर काल शुभारंभ झालेला हा खरेदी महोत्सव दि.१६ फेब्रुवारी पर्यंत सकाळी १० ते रात्री १० वाजेपर्यंत ग्राहकांसाठी खुला असणार आहे.
यासाठी कोणतेही प्रवेश शुल्क नाही. या शॉपिंग महोत्सवामध्ये विविध गृहोपयोगी वस्तु, विविध उपकरणे, सोलर, विविध औषधे, फॅशनेबल ड्रेसेस, साड्या, महिलांसाठी विविध प्रकारची आकर्षक ज्वेलरी, डिझाईन, विविध सौंदर्य प्रसाधने तसेच टू व्हिलर, फोर व्हिलर अशा विविध छोट्यात छोट्या वस्तूंपासून मोठ्यात मोठ्या वस्तूंपर्यंतचे तसेच लहान मुलांपासून तरुण व वृध्द व्यक्तींना उपयुक्त असलेल्या वस्तूंचे प्रदर्शन व विक्री याठिकाणी उपलब्ध आहेत.
सोलर, विविध औषधे, फॅशनेबल ड्रेसेस, साड्या, महिलांसाठी विविध प्रकारची आकर्षक ज्वेलरी, डिझाईन, विविध सौंदर्य प्रसाधने तसेच टू व्हिलर, फोर व्हिलर अशा विविध छोट्यात छोट्या वस्तूंपासून मोठ्यात मोठ्या वस्तूंपर्यंतचे तसेच लहान मुलांपासून तरुण व वृध्द व्यक्तींना उपयुक्त असलेल्या वस्तूंचे प्रदर्शन व विक्री
काल दुसऱ्या दिवशी तालुक्यातील प्रामीण भागातील ग्राहकांनी एक्स्पोला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला. सुत्रसंचालन तालुका प्रतिनिधी ज्ञानेश गबले यांनी केले. सार्वमत शॉपिंग एक्स्पो २०२६ ला तालुक्यातील ग्राहकांची भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
भाग्यवान ग्राहक सोडत
शॉपिग एक्स्पोला भेटी दिलेल्या ग्राहकांनी दररोज कुपन भरुन त्याठिकाणी ठेवलेल्या बॉक्समध्ये कुपन टाकायचे आहे. दिवसभरातील जमा झालेल्या कुपनांपैकी यातून ३ भाग्यवान ग्राहकांची लकी ड्रा पध्दतीने सोडत काढली जात असून दररोज तीन भाम्यवंतांना आकर्षक बक्षिस दिले जाणार आहे. तरी ग्राहकांनी या शॉपिंग महोत्सवास भेट देवून मनमुराद खरेदीचा आनंद लुटावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
कालचे भाग्यवान ग्राहक
१) बदामीदेवी प्रजापती (वर्धमान हौसिंग सोसायटी, कॅनरा रोड, श्रीरामपूर)
२) श्रावणी गणेश शिंदे (अशोक टॉकीजजवळ, श्रीरामपूर)
३) शांतीलाल खुशालचंद घोरडीया (समता कॉलनी, वॉर्ड नं.७)
(विजेत्यांनी आपले बक्षीस ओळखपत्र दाखवून थत्ते मैदान एक्स्पो स्थळी अथवा दैनिक सार्वमत कार्यालयातून घेऊन जावे.)
आज ग्रुप डान्सचे आयोजन
एक्स्यो मध्ये मनोरंजनाच्या कार्यक्रमामध्ये आज शनिवार दि. १४ फेब्रुवारी रोजी ग्रुप डान्स व रविवार दि. १५ फेब्रुवारी सायंकाळी ६ ते ९ यावेळेत खास महिलांकरिता खेळ पैठणीचा हा कार्यक्रम होणार आहे. तर सोमवार दि. १६ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजता नामवंत कलाकारांचा अविष्कार असलेल्या ऑर्केस्ट्राचेही आयोजन करण्यात आले आहे.





