Friday, May 3, 2024
Homeनाशिककरंजवण धरण @९०; दिंडोरीतील धरणांची 'अशी' आहे स्थिती

करंजवण धरण @९०; दिंडोरीतील धरणांची ‘अशी’ आहे स्थिती

ओझे | वार्ताहर | Oze

दिंडोरी तालुक्यात (Dindori Taluka) गेल्या चार दिवसांपासून पावसाने (Rain) दमदार हजेरी लावल्यामुळे तालुक्यातील करंजवण धरण (Karanjavan Dam) ९० टक्के भरले आहे…

- Advertisement -

यामुळे निफाड, येवला, मनमाड तालुक्याचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लागल्याचे चित्र आहे.

तालुक्यातील पुणेगाव धरण (Punegaon Dam) ९७.४३ टक्के भरले आहे. पुणेगाव धरणातून उनंदा नदीपात्रात सोडण्यात आले. पुणेगाव कालव्यातून दवसवाडीकडे ७० क्युसेक पाणी १ ऑक्टोबरपासून सोडण्यात आले आहे.

पुणेगाव धरणक्षेत्रात तसेच मांजरपाडा (देवसाणे) प्रकल्प क्षेत्रात पाऊस पडल्यास पुन्हा ओझरखेड धरणात पाणी सोडण्यात येईल. सध्या ओझरखेड धरणाचा पाणीसाठा ८० टक्क्यांवर पोहचला आहे.

Visual Story : नवरात्रात नाशिकच्या ‘या’ पाच देवींचे दर्शन घ्या एका क्लिकवर

त्यामुळे ओझरखेड धरण भरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. तसेच तालुक्यात पूर्वभागातील शेतकऱ्यांना वरदान ठरलेले तिसगाव धरण ९८.२४ टक्के भरले आहे.

त्याचप्रमाणे पालखेड धरण १०० टक्के भरलेले आहे. धरणातून कादवा नदीपात्रात ४३७ क्युसेक पाण्याचा विसर्ग चालू आहे तर पंधरा दिवसांपूर्वी वाघाड धरण १०० टक्के भरले आहे.

या धरणाच्या सांडव्यातून कोलवण नदीपात्रात पाण्याचा विसंर्ग सुरु आहे. दिंडोरी तालुक्यात रोज जोरदार पाऊस पडत असल्यामुळे लवकरच करंजवण, ओझरखेड धरण भरण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या