रावेर|प्रतिनिधी raver
- Advertisement -
तालुक्यातील चिनावल, कुंभारखेडा (Chinawal, Kumbharkheda) येथे सुरू असलेल्या (Farmers) शेतकऱ्यांच्या नुकसानीच्या घटना ताज्या असतांना, आता अजनाड या ठिकाणी देखील शुक्रवारी (Bananas) केळी खोड कापून टाकल्याचे प्रकार उघडकीस आला आहे.या प्रकरणी रावेर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून,या घटनेचा तपास करत आहे.
येथील जगन्नाथ धनु चौधरी,कडू लक्ष्मण महाजन,गजानन भास्कर पाटील,सुरेश लक्ष्मण महाजन,देवेंद्र नारायण महाजन,प्रकाश विठ्ठल महाजन यांच्या शेतातील केळी खोड अज्ञात माथेफिरूकडून कापण्यात आल्याचा प्रकार शुक्रवारी उघडकीस आला.याबाबत रावेर पोलिसात शेतकऱ्यांनी गुन्हा दाखल केला असून,घटनास्थळी पोलीस उपनिरीक्षक मनोहर जाधव व कर्मचारी पाहणी करण्यासाठी पोहचले आहे.या घटनेने शेतकरी संतप्त झाले आहे.