Friday, May 3, 2024
Homeनगरदारणा ओव्हरफ्लो

दारणा ओव्हरफ्लो

अस्तगाव |वार्ताहर| Astgav

दारणा (Darna), गंगापूर धरणांच्या पाणलोट (Watershed of Gangapur Dam) क्षेत्रात पावसाच्या (Rain) संततधारेमुळे दारणा काल गुरुवारी सायंकाळी 6 वाजता 78 टक्क्यांवर पोहचले होते. तर गंगापूर धरण (Gangapur Dam) 53.35 टक्के इतके झाले आहे. भावली (Bhavali) 85 टक्क्यांवर पोहचले आहे. दारणातून (Darna) 550 क्युसेकने विसर्ग विद्युत प्रकल्पाच्या गेट मधून सोडण्यात येत आहे. तर नाशिकच्या फ्री कॅचमेंट (Nashik Free Catchment) मधील पावसाचे पाणी नांदूरमधमेश्वर (Nandurmadhameshwar) बंधार्‍यात दाखल झाल्याने गोदावरीत (Godavari) काल सकाळी 6310 क्युसेकने विसर्ग सोडण्यात आले होते. नंतर ते अवघे 200 क्युसेकने सुरू होते.

- Advertisement -

काल सकाळी 6 वाजता संपलेल्या मागील 24 तासांत धरण क्षेत्रात पाऊस धुव्वाधार बरसला. भावलीला (Bhavali) 24 तासांत 296 मिमी पावसाची नोंद झाली. यामुळे भावलीचा साठा काल सकाळी 6 पर्यंत 85.95 टक्के झाला होता. काल सायंकाळी 6 पर्यंत हा साठा 90 टक्क्यांवर पोहचला होता. काल दुपारी पावसाचा जोर कमी असला तरी घाटमाथ्यावरील पाण्याची आवक सुरुच होती. दारणा धरणाच्या पाणलोटातील (Watershed of Darna Dam) इगतपुरी (Igatpuri) येथे 240 मिमी, घोटी (Ghoti) येथे 132 मिमी, तर दारणाच्या (Darna) भिंतीजवळ 70 मिमी पावसाची नोंद झाली. या पावसाने दारणात 24 तासांत 924 दलघफू म्हणजेच जवळपास एक टीएमसी पाणी नव्याने दाखल झाले. काल सकाळी धरण 73.30 टक्क्यांवर पोहचले होते तर काल सायंकाळी 6 वाजता हे धरण 78 टक्क्यांवर पोहचले होते. 7149 दशलक्ष घनफूट क्षमतेच्या या धरणात 5240 दलघफू पाणीसाठा सकाळी होता. काल सायंकाळी यात वाढ झाली. या धरणाच्या विद्युत गृहच्या दरवाजातून 550 क्युसेकने विसर्ग सोडण्यात येत होता. पाण्याची आवक वाढली तर दारणाच्या वक्राकर दरवाजातून विसर्ग सोडण्यात येणार आहे. हे पाणी नांदूरमधमेश्वर बंधार्‍याच्या दिशेने म्हणजेचे गोदावरी च्या दिशेने प्रवाहित होत आहे.

गंगापूर धरणाच्या पाणलोटातही काल सकाळी 6 वाजता संपलेल्या मागील 24 तासांत अंबोलीला 266 मिमी, त्र्यंबक ला 216 मिमी, गंगापूरच्या भिंतीजवळ 237 मिमी पावसाची नोंद झाली. त्यामुळे 24 तासांत गंगापूर मध्ये पाऊण टीएमसी पाणी नव्याने दाखल झाले. काल सकाळी 49.71 टक्के पाणीसाठा तयार झाला होता. म्हणजेच सकाळी हे धरण निम्मे भरले होते. दिवसभरात काल सायंकाळी पाण्याची आवक सुरुच होती. त्यामुळे 53.35 टक्क्यांवर पोहचले होते. सकाळी 6 ते सायंकाळी 6 या 12 तासांत या धरणात 64 दलघफू नवीन पाणी दाखल झाले. 5630 क्षमतेच्या या धरणात काल सायंकाळी 6 वाजता 3004 दलघफू पाणीसाठा तयार झाला होता. कश्यपी धरण 29.75 टक्क्यांवर, गौतमी गोदावरी 31.90 टक्क्यांवर पोहचले होते. काल दुपारनंतर गंगापूर च्या पाणलोटातील पावसाचा जोर काहिसा ओसरला होता. काल दिवसभरातील 12 तासांत गंगापूरला 18 मिमी, कश्यपीला 7, गौतमीला 12, त्र्यंबकला 15 मिमी, तर अंबोलीला 15 मिमी पावसाची नोंद झाली होती.

इतर धरणांची काल सकाळी 6 ची आकडेवारी अशी- मुकणे 34.35 टक्के, वाकी 13.17 टक्के, भाम 33.07 टक्के, वालदेवी 66.37 टक्के, कडवा 15.64 टक्के, आळंदी 39.31 टक्के, भोजापूर 14.40 टक्के, पालखेड 29.81 टक्के असा पाणी साठा होता.

जायकवाडीत 27.3 टीएमसी उपयुक्तसाठा

काल सायंकाळी जायकवाडी धरणात फ्री कॅचमेंट मधील पावसाचे पाणी दाखल होत होते. 1241 क्युसेकने पाणी दाखल होत होते. 1 जूनला 32 टक्के असलेला हा साठा काल 35.69 टक्क्यांवर पोहचलेला होता. या धरणात उपयुक्तसाठा 27.3 टिएमसी तर उपयुक्तसह एकूण साठा 53.44 टीएमसी इतका आहे. या धरणाला नगर नाशिक च्या धरणामधुन सोडण्यात येणार्‍या ओव्हरफ्लोची प्रतिक्षा आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या