Tuesday, May 7, 2024
Homeनाशिकसप्तशृंगी गडावर भाविकांना दर्शन पासची सुविधा

सप्तशृंगी गडावर भाविकांना दर्शन पासची सुविधा

सप्तशृंगीगड | Saptsrungigad

सप्तशृंगी च्या दर्शनासाठी नांदुरी- घाट रस्त्या दरम्यान असलेल्या कमानी जवळील दर्शनार्थी भाविकांना दर्शनपास सुविधा कार्यान्वित करण्यात आली आहे.

- Advertisement -

कोविड – १९ संदर्भीय योग्य त्या खबरदारीसह विश्वस्त संस्थेच्या वतीने १६ नोव्हेंबर २०२० पासून कार्यान्वित केले असून निर्धारीत केलेल्या नियोजना प्रमाणे प्रति दिवशी ५७५० भाविकांची दर्शन सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

त्यानुसार मागिल ७ दिवसात ४६ हजार ८७६ भाविकांनी दर्शन घेतले आहे. ऑनलाईन दर्शन पास प्रक्रियेत अडसर होवू नये म्हणून प्राथमिक स्तरावर विश्वस्त संस्थेने मौजे नांदुरी येथे ऑफलाईन दर्शन पास प्रक्रिया कार्यान्वित केली आहे.

सदर ऑफलाईन दर्शन पास प्रक्रियेत भाविकांचे नाव, संपर्क क्रमांक, भाविक संख्या, नोंदणी वेळ व संभाव्य दर्शनाची संधी (वेळ) तसेच थर्मलगनचा वापर करून भाविकांच्या शरीराचे तापमान तपासून दर्शन पास देणे बाबतची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. सदर दर्शन पास हा पायी मार्गे व रोपवे माध्यमातून मंदिरात जाणाऱ्या भाविकांना प्राप्त करून घेणे बंधनकारक आहे.

भाविकांनी दर्शनासाठी येताना योग्य ती खबरदारी घेत सुरक्षित अंतर राखून यावे. त्याचप्रमाणे मंदिर ट्रस्टला करावे.

– सुदर्शन दहातोंडे, व्यवस्थापक, श्री सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्ट

- Advertisment -

ताज्या बातम्या