Thursday, March 13, 2025
Homeब्रेकिंग न्यूजAjit Pawar : मंत्री मुंडेंना नडणाऱ्या आमदार धस आणि सोळंकेंचा अजित पवारांनी...

Ajit Pawar : मंत्री मुंडेंना नडणाऱ्या आमदार धस आणि सोळंकेंचा अजित पवारांनी केला ‘करेक्ट कार्यक्रम’

बीड | Beed

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे आज बीडच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर पहिल्यांदाच जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले आहेत. त्यांच्या उपस्थितीत काही वेळापूर्वीच जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीस सूरूवात झाली आहे. मात्र,या बैठकीच्या पूर्वसंध्येलाच शासनाने नियोजन समितीच्या नामनिर्देशित सदस्यांची नियुक्ती केली. यात राष्ट्रवादी मंत्री धनंजय मुंडे यांना नडणाऱ्या भाजपचे आमदार सुरेश धस (Suresh Dhas) आणि प्रकाश सोळंके (Prakash Solanke) यांना जिल्हा नियोजन सदस्य समितीमधून वगळण्यात आले आहे. त्यामुळे अजित पवारांनी या दोन्ही विरोधकांना धक्का दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

- Advertisement -

बीड जिल्हा नियोजन समितीच्या (Beed District Planning Committee) विधीमंडळ सदस्यांमधून नामनिर्देशित करायच्या दोन सदस्यांमधून आमदार धस आणि सोळंके यांच्याजागी भाजपच्या कोट्यातून केजच्या आमदार नमिता मुंदडा (MLA Namita Mundada) आणि राष्ट्रवादीच्या कोट्यातून गेवराईचे आमदार विजयसिंह पंडित (MLA Vijay Singh Pandit) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यात महायुती सरकार आल्यानंतर राज्यातील सर्वच नियोजन समित्यांवरील नामनिर्देशित सदस्यांच्या नियुक्या रद्द करण्यात आल्या होत्या. त्यामुळे नियोजन समित्यांवर केवळ पालकमंत्री, जिल्हाधिकारी हेच राहिले होते. आता बीड जिल्हा नियोजन समितीवर विधीमंडळ सदस्यांमधून नामनिर्देशित करायच्या दोन जागांवर पंडित आणि मुंदडा यांची नियुक्ती झाली आहे.

दरम्यान, संतोष देशमुख हत्याप्रकरणातील (Santosh Deshmukh Murder Case) आरोपी वाल्मिक कराड (Walmik Karad) आणि धनंजय मुंडे यांचे हितसंबंध असल्याचा आरोप आमदार सुरेश धस आणि प्रकाश सोळंके सातत्याने करत होते.तसेच धस यांनी मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी उचलून धरली होती. याशिवाय राष्ट्रवादीच्याच प्रकाश सोळंकेंनीही मुंडेंना धारेवर धरले होते. मात्र आता या दोघांचाही अजित पवारांनी बीड जिल्हा नियोजन समितीमधून वगळून ‘करेक्ट कार्यक्रम’ केल्याची चर्चा आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

Nashik News : कृष्णा आंधळे नाशकात दिसला? दीड महिन्यांनी पुन्हा नागरिकांचा...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik बीड जिल्ह्यातील (Beed District) मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येतील मुख्य संशयित कृष्णा आंधळे (Krishna Andhale) तीन महिन्यांपासून...