नाशिक | Nashik
आगामी विधानसभा निवडणूक (Vidhansabha Election) अवघ्या चार महिन्यांवर येऊन ठेपली आहे. त्या पार्श्वभूमीवर महायुती आणि महाविकास आघाडीतील (Mahayuti and Mahavikas Aaghadi) घटक पक्षांकडून जोरदार मोचेर्बांधणी सुरु आहे. त्यातच आजपासून महायुतीमधील राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या ‘जनसन्मान यात्रे’ला नाशिकच्या दिंडोरीतून सुरुवात झाली आहे.
त्या पार्श्वभूमीवर काही वेळापूर्वीच उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) आपल्या पक्षातील सहकाऱ्यांसह कार्यक्रमस्थळी दाखल झाले आहेत. मात्र, अजित पवारांच्या जनसन्मान यात्रेत गुलाबी रंगाची (Pink Color) हवा पाहायला मिळत आहे. कारण अजित पवारांच्या ‘जनसन्मान यात्रे’त दादांचे गुलाबी जॅकेट आणि जनसन्मान यात्रेसाठी तयार करण्यात आलेली गुलाबी रंगाची बस (Bus) सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.
हे देखील वाचा : संपादकीय : ८ ऑगस्ट २०२४ – योजनेची अंमलबजावणी होणे गरजेचे
याशिवाय अजित पवार यांच्या ताफ्यातील वाहनांना गुलाबी रंग देण्यात आला आहे. तसेच या यात्रेत राष्ट्रवादीचे नेते गुलाबी रंगाची बस आणि गुलाबी रंगाच्या चारचाकीतून प्रवास करणार आहेत. या यात्रेतील बसवर ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’ची माहिती देण्यात आली आहे. विशेष म्हणजे जनसन्मान यात्रेच्या आयोजनासाठी नेमण्यात आलेल्या टीम मेंम्बरनेही गुलाबी रंगाचेच जॅकेट्स परिधान केले आहेत.
हे देखील वाचा : रिझर्व बँकेचे पतधोरण जाहीर; गृह, वाहन कर्जाचा हप्ता वाढणार की कमी होणार?
दरम्यान, अजित पवार या यात्रेच्या माध्यामतून दररोज दोन विधानसभा मतदारसंघांचा आढावा घेणार असून ते चार दिवसाच्या नाशिक दौऱ्यावर (Nashik Tour) आहेत. या जनसन्मान यात्रेच्या माध्यमातून अजित पवार राज्यातील जास्तीत जास्त जनतेशी संपर्क साधणार आहेत. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची सध्या सगळीकडे चर्चा आहे. या योजनेमुळे महिलांची मतं आम्हाला मिळू शकतात, अशी आशा महायुतीच्या घटकपक्षांना आहे. म्हणूनच महिला मतदारांना आकर्षित करण्यासाठी अजित पवार यांच्या जनसन्मान यांत्रेत अधिकाधिक गुलाबी रंग वापरण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे अजित पवार यांच्या जनसन्मान यात्रेला कितपत यश मिळते हे विधानसभा निवडणुकीतच दिसेल.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा