Thursday, September 19, 2024
Homeनगरविकासाच्या मुद्यावर निवडणुकीला सामोरे जाणार

विकासाच्या मुद्यावर निवडणुकीला सामोरे जाणार

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी घेतले साईदर्शन

शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi

- Advertisement -

लोकसभा निवडणुकीत (Loksabha Election) एकमेकांवर आरोप प्रत्यारोप झाले. मात्र आगामी विधानसभा निवडणुकीत (Assembly Elections) हे सर्व टाळून, महायुती सरकारने केलेली कामे व लोकहितासाठी घेतलेल्या निर्णयांची माहिती जनतेपर्यंत पोहचवून विकासाच्या मुद्यावर निवडणुकीला सामोरे जाणार असल्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (DCM Ajit Pawar) यांनी शनिवारी शिर्डीत (Shirdi) स्पष्ट केले. जनसन्मान यात्रेच्या (Jansanman yatra) निमीत्ताने शिर्डीत आलेल्या पवार यांनी साईदर्शनानंतर पत्रकारांशी संवाद साधला़ यावेळी राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तडकरे, मंत्री अनिल पाटील, महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर, आमदार आशुतोष काळे, राष्ट्रवादीचे रमेशराव गोंदकर, संदीप सोनवणे, संग्राम कोते, दिपक गोंदकर आदीं उपस्थीत होते.

यावेळी बोलताना अजित पवार म्हणाले, आम्ही सरकारमध्ये समाविष्ट झाल्यानंतर बहिण, भाऊ, शेतकरी, युवक युवती आदींसाठी घेतलेल्या निर्णयांची माहिती जनसन्मान यात्रेच्या माध्यमातुन जनतेपर्यंत पोहचवत आहोत. या यात्रेला खुप चांगला प्रतिसाद मिळत आहे. यात्रेच्या (Jansanman yatra) निमीत्ताने धार्मिक स्थळांना भेटी देऊन आशिर्वादही घेत आहोत. देवांना जरी साकडे घातले तरी जे मतदार राजाच्या मनात आहे तेच घडतं त्यामुळे त्यांच्या पर्यंत विकासाचे मुद्दे घेऊन आम्ही जात आहोत. मागच्या निवडणुकीत काय झाल, किंवा कुणी आरोप-प्रत्यारोप केले. ते सगळ गंगेला मिळाल. आता आम्ही नव्या उमेदीने लोकासमोर चाललोय. आता ठामपणे ठरवलंय, केवळ विकासावरच बोलायच, अर्थसंकल्पात जे निर्णय घेतले त्यावर ठामपणे अंमलबजावणी करायची. महायुतीत काही मतभेद असतील तर त्यावर बैठकीत चर्चा होईल.

पब्लीकमध्ये त्यावर बोलायचे नाही. बर्‍याचदा आम्ही न बोललेलही आमच्या तोंडी घातले जाते अशी खंतही पवार यांनी व्यक्त केली. मंत्रालयासमोरील एक भूखंड शासनाने खासगी संस्थेला दिल्याचे त्यांनी समर्थन केले. चांगले काम करणार्‍या संस्थांना मदत करण्याचे सरकारचे धोरण असते. त्यातुनच हा निर्णय झाला. साईसंस्थान विश्वस्त (Sai Sansthan Trustees) नियुक्तीबद्दल विचारले असता त्यांनी संस्थानचे सीईओ व डेप्युटी सीईओ दोघेही जिल्ह्यातीलच आहेत. भाविकांच्या व विकासाच्या दृष्टीने ते उत्तम काम करत आहेत असा खुलासा केला. संस्थान विश्वस्त निवडीची प्रक्रिया न्यायालयात अडकली आहे. न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे पुढच्या गोष्टी करण्याचा सरकारचा प्रयत्न असेल असेही पवार यांनी स्पष्ट केले.

- Advertisment -

ताज्या बातम्या