Friday, October 18, 2024
Homeब्रेकिंग न्यूजकाही लोकांच्या बुध्दीवर बुरशी आणि…; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विरोधकांवर टीकास्र

काही लोकांच्या बुध्दीवर बुरशी आणि…; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विरोधकांवर टीकास्र

सातारा | Satara
छत्रपती शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा वध ज्या वाघनखांनी केला ती वाघनखे आज इंग्लंडच्या म्युझियम येथून साताऱ्यात आणली आहे. साताऱ्यातील वास्तू संग्रहालयात ही वाघनखे प्रदर्शनासाठी ठेवली आहेत. या वाघनखांच्या प्रदर्शनाचा भव्या उद्घाटन सोहळा आज पार पडला. या कार्यक्रमाला मु्ख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार छत्रपती उदयनराजे भोसले, शिवेंद्रराजे भोसले या नेत्यांची प्रमुख उपस्थिती होती. ही वाघनखे छत्रपती शिवाजी महाराजांची असल्याचा दावा राज्य सरकारकडून करण्यात आला आहे. मात्र, या दाव्यावर विरोधकांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी वाघनखांच्या मुद्द्यावरुन विरोधकांवर निशाणा साधला.

काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
“छत्रपती शिवाजी महाराजांनी अफझल खानाचा वध केला, तो प्रसंग आपण अनेक पिढ्यांपासून ऐकत आलो आहे. यासाठी शिवरायांनी ज्या शस्त्राचा वापर केला, ती वाघनखं आपल्या महाराष्ट्रात आली असून साताऱ्यात दर्शनासाठी उपलब्ध करण्यात आली आहे. यापेक्षा मोठं भाग्य कुठलंही असू शकत नाही. या वाघनखांच्या माध्यमांतून प्रत्यक्ष शिवरायांच्या इतिहासाशी जुडण्याची संधी आपल्याला मिळाली आहे”, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

- Advertisement -

पुढे बोलताना फडणवीस म्हणाले की, “उदयनराजे आणि शिवेंद्रराजे यांनी वाघनखांवरून वाद करू नका अशी विनंती केली आहे. मात्र, आपल्या देशातील काही लोकांकडे केवळ विरोध करण्याचं काम बाकी आहे. हे लोक उठसूट कोणत्याही गोष्टीला विरोध करतात. हा एक रोग आहे. या रोगाचा सामना प्रत्यक्ष छत्रपती शिवाजी महाराजांनाही करावा लागला होता. मात्र, या विरोधकांचा सामान करत शिवरायांनी रयतेचं राज्य स्थापन केलं ”, असे ते म्हणाले.

“आज सुधीर मुनगंटीवार यांनी ज्यावेळी मुख्यमंत्र्यांचे स्वागत केले, त्यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना वाखनखे भेट दिली आहे. खरे तर आता या वाघनखांनी कुणाचा कोथळा काढायचा नाही. मात्र, काही लोकांच्या बुद्धीवर बुरशी आणि गंज चढला आहे. त्या वाघनखांनी त्यांच्या बुद्धीवरची बुरशी आणि गंज काढण्याचे काम मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना करायचे आहे”, अशी टीकाही देवेंद्र फडणवीस यांनी केली.

“आमच्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज हे युगपुरूष आहेत, ते आमचा आराध्य दैवत आहेत. ते खऱ्या अर्थाने देव-देश आणि धर्माकरिता लढणारे मावळ्यांचे प्रेरणास्थान आहेत. शिवरायांच्या राज्यभिषेकाला ३५० वर्ष झाली आहेत. पण आजही छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेतल्यावर रक्त सळसळतं. ही खऱ्या अर्थाने त्यांनी तयार केलेली किमया आहे”, असेही ते म्हणाले.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या