Wednesday, January 7, 2026
Homeब्रेकिंग न्यूजDevendra Fadnavis Birthday: "विश्वासाचा हात असू दे, मैत्रीचा सहवास असू दे"; उपमुख्यमंत्री...

Devendra Fadnavis Birthday: “विश्वासाचा हात असू दे, मैत्रीचा सहवास असू दे”; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिलेल्या शुभेच्छांनी वेधले लक्ष

"अर्थशास्त्रावर विलक्षण पकड असलेला उत्तम प्रशासक म्हणत अजित दादांना ही दिल्या शुभेच्छा

मुंबई | Mumbai
राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा वाढदिवस आहे. देवेंद्र फडणवीस हे आज ५६ व्या वयात पदार्पण करत आहेत. तर अजित पवार वयाच्या ६७व्या वर्षात पदार्पण करत आहेत. वाढदिवसाच्या निमित्ताने या दोन्ही नेत्यांवर राजकीय आणि सामाजिक वर्तुळातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही दोघांना सोशल मीडियाच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या आहेत. एकनाथ शिंदेंनी शुभेच्छा देताना लिहिलेल्या शब्दांनी लक्ष वेधून घेतले आहे. एकनाथ शिंदे यांनी या दोघांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना त्यांच्यासाठी अनेक विशेषणे वापरली आहेत. शिंदेंनी या दोन्ही नेत्यांची मुक्तकंठाने तारीफ केली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना शुभेच्छा देताना एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे की, “विश्वासाचा हात असू दे, मैत्रीचा सहवास असू दे. महाराष्ट्राच्या उध्दाराचा रात्रंदिन हा ध्यास असू दे. महाराष्ट्राच्या विकासयात्रेचे बिनीचे शिलेदार मा. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना जन्मदिनाच्या उदंड शुभेच्छा”.

- Advertisement -

नेमके काय म्हंटले आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे?
विश्वासाचा हात असू दे, मैत्रीचा सहवास असू दे
महाराष्ट्राच्या उध्दाराचा रात्रंदिन हा ध्यास असू दे

YouTube video player

महाराष्ट्राच्या विकासयात्रेचे बिनीचे शिलेदार मा. मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना जन्मदिनाच्या उदंड शुभेच्छा!

सर्व साथीदारांना खंबीरपणे पुढे नेणारे महायुतीचे अव्वल मित्र आणि सहकारी, जनतेचा आवाज बुलंद करणारे नेते, महाराष्ट्राच्या समृध्दीयात्रेत दमदार पावले टाकत सदैव पुढे असणारे मुख्यमंत्री, उत्तम प्रशासक, अर्थशास्त्र आणि कायद्याची जाण असलेले बुध्दिमान तसेच ‘व्हीजनरी’ नेतृत्त्व. अनेक गुणांचा समुच्चय असलेल्या आणि सकारात्मकतेचं मूर्तिमंत उदाहरण ठरलेल्या मित्रवर्य देवेंद्रजी यांना दीर्घ आणि आरोग्यपूर्ण आयुष्य लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना!

जीवेत शतम शरद:!!

अर्थशास्त्रावर विलक्षण पकड असलेला उत्तम प्रशासक
महायुतीला भक्कमपणे साथसंगत करणाऱ्या उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार यांना जन्मदिनाच्या अनेक शुभेच्छा! अर्थशास्त्रावर विलक्षण पकड असलेला उत्तम प्रशासक, डोळस विकासाचा निरंतर साथीदार, महाराष्ट्राच्या विकासाची आस असलेला संवेदनशील आणि वक्तशीर नेता म्हणजे आमचे अजितदादा. महाराष्ट्राच्या विकासापुढे काहीही नाही, याची ठाम खूणगाठ बांधून वाटचाल करणाऱ्या या आमच्या मित्रास दीर्घ आणि आरोग्यपूर्ण आयुष्य लाभो, हीच ईश्चर चरणी प्रार्थना!

जीवेत शतम शरद:!!

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा

ताज्या बातम्या

Nashik Municipal Corporation Election : फोटो मॉर्फिंगद्वारे राजकीय हल्ला; माजी नगरसेवकाची...

0
नाशिक | प्रतिनिधी महापालिका निवडणुकीच्या (Mahapalika Election) रणधुमाळीत राजकीय आरोप-प्रत्यारोपांना आता तंत्रज्ञानाची धोकादायक जोड मिळाल्याचे सिडकोतील (Cidco) एका प्रकारातून उघड झाले आहे. एआयचा वापर करून...