अहमदनगर |प्रतिनिधी| Ahmednagar
शहरातील सीनानदी (Sina River) पात्राच्या लगतच्या नाल्यामध्ये 25 फेब्रुवारी 2022 रोजी आढळून आलेल्या मृत पुरूषाची अद्याप ओळख पटलेली नाही. याप्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात (Kotwali Police Station) अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस उपनिरीक्षक महाजन (Sub-Inspector of Police Mahajan) करीत आहेत.
- Advertisement -
मयताचे वर्णन- अंगात नेसूस काळसर, निळसर रंगाची जिन्सपँट, निळसर रंगाचा शर्ट, गळ्यात रूद्राक्ष मण्याची माळ, वय अंदाजे 40 ते 50 वर्षे, उंची पाच फूट सहा इंच, बांधा मध्यम, दाढी पांढरी व वाढलेली, मिशी नाही, नाक बसके, डोक्याचे केस वाढलेले काळे व पांढरे, कपाळ रूंद असे आहे. वरील वर्णन असलेल्या व्यक्तीविषयी कोणाला काही माहिती असल्यास त्यांनी पोलिसांशी संपर्क साधण्याचे आव्हान कोतवाली पोलिसांनी केले आहे.