Friday, May 3, 2024
Homeजळगावविषारी द्रव्य प्राशन करणार्‍या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

विषारी द्रव्य प्राशन करणार्‍या तरुणाचा उपचारादरम्यान मृत्यू

जळगाव – Jalgaon

तालुक्यातील भोलाणे येथील २२ वर्षीय तरुणाने बुधवारी दुपारी शेतात विषारी औषध प्राशन केल्याची घटना घडली होती.

- Advertisement -

या तरुणावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु असतांना मध्यरात्रीच्या सुमारास त्याची प्राणज्योत मालवली. याप्रकरणी तालुका पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून तरुणाच्या मृत्यूचे कारण आद्यप अस्पष्ट आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील भोलाणे येथील गोकुळ सुकदेव सपकाळे (वय २२) असे मयत तरुणाचे नाव असून तो आई वडीलांसह वास्तव्या होता. गावाजवळीलच शेतशिवारातील शेतात तो मोलमजूरी करुन कुटुंबाला हातभार लावित होता. बुधवारी १० मार्च रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास गोकुळ शेतात काम करीत असतांना त्याने शेतीसाठी लागणारे विषारी औषध प्राशन केले.

त्यानंतर तो तशाच परिस्थितीमध्ये गावात आला आणि आपला चुलत भाऊ जगदिश सपकाळे याला आपण विषारी औषध प्राशन केल्याचे त्याने सांगितले. जगदिशने त्याला तात्काळ जिल्हा वैद्यकीय रूग्णालयात उपचारार्थ दाखल केले. मयत गोकुळ याच्या पश्चात आई सुलाबाई, वडील सुकदेव सपकाळे, तुकाराम आणि मदन हे दोन मोठे भाऊ, दोन विवाहित बहिणी असा परिवार आहे. दोन्ही मोठे भाऊ विवाहित असून कुटुंबासह ठाणे येथे राहतात. तर गोकुळ हा अविवाहित होता.

मध्यरात्रीच्या सुमारास मालवली प्राणज्योत

विषारी द्रव्य प्राशन केल्यानंतर गोकुळ अत्यावस्थ परिस्थितीत त्याच्यावर उपचार सुरु होते. उपचार सुरु असतांनाच बुधवारी मध्यरात्री २ वाजेच्या सुमारास त्याची प्राणज्योत मालवली.

- Advertisment -

ताज्या बातम्या