सुरगाणा | प्रतिनिधी Surgana
अलंगुण जवळील हातरुंडी पैकी तळपाडा येथील ६५ वर्षीयर महिला नार पार नदीच्या पुरात वाहुन मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
सुमतीबाईं चिमण दळवी (६५) ही महिला दि.२१ ऑगस्ट रोजी चार ते पाच वाजेच्या दरम्यान दातरीचापाडा येथे आपल्या मुलीकडे जाण्यासाठी निघाली होती. तळपाडा येथे नार नदीवर पूल नसल्याने नार नदीच्या पात्रातून उतरत असतांना पाय घसरुन पाण्यात पडून वाहून गेली. संध्याकाळच्या सुमारास मुलगा चंद्रकांत हा आई नेमकी कोठे गेली म्हणून गावात इतरत्र शोधा शोध करीत होता.
शोध घेतला असता तळपाडा येथून दीड ते दोन किलोमीटर अंतरावरील कोल्हापूरी सिमेंट बंधार्यातील लोखंडी प्लेटला मृतदेह अडकून असल्याचे आढळून आला.
याबाबत पोलीस पाटील मधुकर गावित यांनी तहसिलदार रामजी राठोड यांना माहिती दिली. त्यांनी तात्काळ या घटनेची दखल घेत जिल्हा नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन विभागास माहिती दिली. मृतदेह बाहेर काढण्यात आला.





