Friday, May 17, 2024
Homeधुळेन्याहळोद येथील सैन्य दलातील जवानाचा मृत्यू

न्याहळोद येथील सैन्य दलातील जवानाचा मृत्यू

धुळे । Dhule । प्रतिनिधी

सियाचिन ग्लेशियर (Siachen Glacier) या ठिकाणी ऑपरेशन मेघदूतमध्ये (Operation Meghdoot) सेवा बजावत (Serving) असतांना तेथील हवामानाच्या दुष्परिणामामुळे झालेल्या त्रासाने (adverse weather conditions) सैन्य दलातील (military man) हवालदार (constable) मनोहर रामचंद्र पाटील (वय 42, रा. न्याहळोद, ता. धुळे) यांचा दि. 5 सप्टेंबर रोजी मृत्यू (death) झाला त्यांचा मृतदेह (dead body) उद्या दि. 7 सप्टेंबर रोजी न्याहळोद येथे आणण्यात येणार आहे. त्यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहे. अशी माहिती जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयाचे संघटक रामदास पाटील यांनी दिली आहे.

- Advertisement -

धुळे तालुक्यातील न्याहळोद येथील रहिवाशी रामचंद्र परशुराम पाटील यांचा मुलगा मनोहर रामचंद्र पाटील हे दि. 9 जानेवारी 2002 रोजी भारतीय सैन्यदलात भरती झाली. ते हवालदार या पदावर कार्यरत होते. सध्या 219 फिल्ड वर्कशॉप येथे भारतीय सैन्यात शियाचिन ग्लेशिअर या ठिकाणी ऑपरेशन मेघदूतमध्ये सेवा बजावत असतांना दि. 16 जुलै 2022 रोजी तेथील हवामानाच्या दुष्परिणामामुळे त्यांना तीव्र डोकेदुखी व उलटी होत असल्याने त्याच दिवशी तातडीने हेलीकॅप्टरने पुढील उपचारासाठी 403 फिल्ड हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले. याबाबत त्यांच्या कुटुंबियांना माहिती देण्यात आली होती.

तेथे जवानाची पत्नी माया (वय32) आणि पुतण्या हे त्यांच्याजवळ होते. परंतू उपचारादरम्यान दि. 5 सप्टेंबर रोजी सायंकाळी 5.22 वाजता त्यांचा मृत्यू झाला.

मयत मनोहर यांचा मृतदेह दिल्ली येथून हवाई मार्गाने पुणे येथे आणण्यात येणार आहे. त्यानंतर रुग्णवाहिकेद्वारे न्याहळोद येथे उद्या दि. 7 सप्टेंबर रोजी आणण्यात येईल.

मनोहर यांच्या पश्चात पत्नी माया, नऊ वर्षाची मुलगी, आई-वडील, चार भाऊ असा परिवार आहे.

मनोहर यांच्यावर उद्या दि. 7 रोजी न्याहळोद येथील विश्वनाथ रोडवर पांझरा नदीपात्रात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. सैन्य दलातील कॅप्टन प्रतिक व दोन जवान हे देखील येणार आहेत. तसेच सैन्य दलातील 14 जणांची टीम न्याहळोद येथे येणार असून ही टीम मनोहर पाटील यांना मानवंदना देणार आहे. अशी माहिती देखील रामदास पाटील यांनी दिली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या