Thursday, May 2, 2024
Homeमहाराष्ट्रBuldhana Bus Accident : मुलाला कॉलेजला सोडलं अन् विदर्भ ट्रॅव्हल्स पकडली, बुलढाणा...

Buldhana Bus Accident : मुलाला कॉलेजला सोडलं अन् विदर्भ ट्रॅव्हल्स पकडली, बुलढाणा अपघातात आई वडिलांसह मुलीचा मृत्यू

मुंबई | Mumbai

राज्यासाठी आजचा दिवस अत्यंत दु:खाचा ठरला. कारण, विकासाचा महामार्ग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या समृद्धी महामार्गावरील बुलडाण्याजवळ एका खासगी ट्रॅव्हल्स बसचा भीषण अपघात झाला. भरधाव वेगात असलेल्या ट्रॅव्हल्स बसवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने बस थेट डिव्हायडरला जाऊन धडकली. डिझेल टाकीने अचानक पेट घेतल्याने स्फोट होऊन बसला भीषण आग लागली. या दुर्घटनेत आतापर्यंत २६ प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाल्याची माहिती आहे. पोलिसांकडून (Police) मृतांची ओळख पटवणे सुरू आहे.

- Advertisement -

दुसरीकडे या अपघातात अनेक कुटुंबे उद्धवस्त झाली आहे. या भीषण अपघातात आंबेगाव तालुक्यातील निरगुडसर गावाच्या एकाच कुटूंबातील तीन जणांचा मृत्यू झाल्याने परिसरात शोककळा पसरली आहे. निरगुडसर येथील पंडित जवाहरलाल नेहरू विद्यालयाचे प्राध्यापक कैलास गंगावणे, पत्नी कांचन गंगावणे व मुलगी डॉक्टर सई गंगावणे या तिघांचाही या अपघातात दुर्दैवी मृत्यू झालाय. नागपूरहून पुण्याच्या दिशेने गंगावणे कुटुंब प्रवासासाठी विदर्भ ट्रॅव्हल्स बसने निघाले होते. गंगावणे कुटुंबीयांच्या मुलाला नागपूरमधील विधी महाविद्यालयात प्रवेश मिळाला होता. त्याला महाविद्यालयात सोडून हे कुटुंबीय परतीच्या दिशेने निघाले असताना त्यांच्यावर काळाने घाला घातला. तिघांच्याही मृत्यूमुळे आंबेगाव परिसरात शोककळा पसरली आहे.

Buldhana Bus Accident : बसचा केवळ सांगाडा उरला, प्रवाशांचा झाला कोळसा… मृतांची ओळख पटवणार कशी?

कसा झाला अपघात?

बस रात्री 1.35 च्या सुमारास नागपूरहून पुण्याकडे जात असताना सिंदखेडराजाजवळ पिंपळखुटा गावानजीक एका खांबावर जाऊन आदळली. याबाबत ड्रायव्हरला विचारलं असता टायर फुटल्यानं बस जाऊन आदळल्याचं त्यानं सांगितलं. त्यानंतर खांब बाजूला जाऊन उडाला. त्याचवेळी बस पुढे जाणाऱ्या डिझेल टँकरवर जाऊन आदळली. डिझेल टँकचा स्फोट झाला आणि मोठ्या स्फोट झाला. स्फोट झाल्यानंतर गाडी सुमारे 30 ते 40 फुट पुढे जाऊन पलटी झाली आणि अचनाक गाडीत आग लागली, अशी माहिती पोलीस अधिक्षकांनी दिली. तसेच, गाडीचा अपघात झाला त्यावेळी प्रवासी गाडीत झोपले होते. त्यामुळे गाडीचा अपघात झाला याबाबत अनेकांना कल्पना नव्हती. त्यावेळी जेवढे प्रवासी काचा फोडून बसबाहेर पडले, तेवढे प्रवासी सुखरुप बचावले आहेत, अशी माहितीही पोलीस अधिक्षकांनी दिली आहे. बसमधील सर्वाधिक प्रवासी हे नागपूरचे होते. त्यानंतर बस मध्ये यवतमाळला थांबली होती. त्यामुळे यवतमाळमध्येही काही प्रवासी बसमध्ये चढल्याची माहिती मिळत आहे. अजून कोणते प्रवासी कुठून बसमध्ये चढले याबाबत मात्र योग्य माहिती अद्याप हाती आलेली नाही, असंही पोलीस अधिक्षकांनी सांगितलं.

Buldhana Bus Accident : बुलढाण्यातील अपघाताने तरी सरकारचे डोळे उघडावेत, उद्धव ठाकरेंनी सुनावलं

दरम्यान, या घटनेवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील शोक व्यक्त केला आहे. महाराष्ट्रातील बुलढाणा येथे घडलेली गाडीची दुर्घटना अतिशय दु:खद आहे. ज्या व्यक्तींचा या अपघातात मृत्यु झाला त्यांच्या कुटुंबियांविषयी मी संवेदना व्यक्त करतो, असे मोदी म्हणाले. तसेच त्यांनी मृतांच्या नातेवाईकांनी 2 लाख रुपयांची मदत जारी केली असून जखमींना 50 हजार रुपयांची मदत जारी केली आहे. तसेच राज्य सरकारने मृतांच्या नातेवाईकांना 5 लाख रुपयांची मदत जारी केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या