Thursday, February 5, 2026
Homeब्रेकिंग न्यूजविजेचा शॉक लागून ग्रामपंचायत कर्मचाऱ्याचा मृत्यू

विजेचा शॉक लागून ग्रामपंचायत कर्मचाऱ्याचा मृत्यू

येवला । प्रतिनिधी Yeola

- Advertisement -

येवला तालुक्यातील रहाडी येथे विजेचा शॉकने ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

YouTube video player

गुरुवारी, (दि. ५) रोजी सकाळी साडे आठ वाजेच्या सुमारास रहाडी येथे ग्रामपंचायत शिपाई ज्ञानेश्वर वेडू गायकवाड (वय ४९) रहाडी बंधाऱ्या जवळील विद्युत खांबावरील बटण बंद करण्यासाठी गेले होते. यावेळी पावसाने बटणात विज प्रवाह उतरला असल्याने शिपाई गायकवाड यांचा विजेच्या शॉकने दुर्दैवी मृत्यू झाला. गायकवाड यांना तातडीने खाजगी रुग्णवाहिकेद्वारे येवला उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले.

सदर घटनेमुळे संतप्त ग्रामपंचायत कर्मचारी संघटनेने घटनेला जबाबदार असलेल्या संबंधितांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी करून मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पवित्र घेतला. मात्र प्रशासनाच्या हस्तक्षेपा नंतर अंत्यसंस्कार करण्यात आले. दरम्यान, या प्रकरणी तालुका पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून अधिक तपास तालुका पोलीस करत आहेत.

ताज्या बातम्या

Nashik Crime : किन्नरांच्या गटांत संघर्ष! दुफळी माजली; वसुली, वर्चस्व आणि...

0
नाशिक | प्रतिनिधी | Nashik शहर व जिल्ह्यातील तृतीयपंथीय समुदायाचे (Transgender Community) 'गटतट निर्माण झाले असून 'वसूली' सह वर्चस्व वादातून त्यांच्यातील संघर्ष पेटत चालला आहे....