पिंपळगाव बसवंत | प्रतिनिधी | Pimpalgaon Basawant
येथील घागरनाला ओहळमधील पानसरे वस्तीवरील विद्युत रोहित्राच्या विजेचा धक्का लागून राष्ट्रीय पक्षी असलेल्या मोर (Peacock) व बिबट्याचा मृत्यू झाल्याची घटना आज गुरु पौर्णिमेच्या दिवशी घडली आहे. या घटनेमुळे पशुपक्षी प्रेमी मित्रांवर गुरु पौर्णिमेच्या उत्सवाच्या आनंदावर विरजण पडले आहे.
हे देखील वाचा : मंत्रिमंडळ विस्ताराची शक्यता मावळली; शिंदे गटातील इच्छुकांचा हिरमोड
याबाबत अधिक माहिती अशी की, पिंपळगाव बसवंत (Pimpalgaon Basawant) शहरातील ऊंबरखेड परीसरात काही दिवसांपासून बिबट्याचा वावर होता.सदरचा बिबट्या पहाटेच्या सुमारास मोराच्या मागे लागला. मात्र, मोर विद्युत रोहित्राच्या (ट्रान्सफॉर्मरवर) आत जाऊन बसला असता त्यास पकडण्यासाठी बिबट्या विद्युत रोहित्रावर चढला.
हे देखील वाचा : बिबट्याच्या हल्ल्यात युवक जखमी
यात सदर विद्युत रोहित्राचा बिबट्याच्या (Leopard) शेपटीला धक्का लागला व शॉक लागून बिबट्याचा जागेवरच मृत्यू झाला. तसेच मोराचा पण यात मृत्यू झाला आहे.या बिबट्याचे वय हे जवळपास नऊ वर्ष असून तो नर जातीचा बिबट्या आहे. तर वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी पंचनामा करून मोर व बिबट्या ताब्यात घेतला आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा