Wednesday, May 8, 2024
Homeजळगावफेसबुकवर अश्‍लिल फोटो अपलोड करुन मुख्याधिकार्‍यांच्या पत्नीची बदनामी

फेसबुकवर अश्‍लिल फोटो अपलोड करुन मुख्याधिकार्‍यांच्या पत्नीची बदनामी

जळगाव jalgaon

बनावट फेसबुक अकाऊंटवरून (Fake Facebook account) अश्‍लील फोटो अपलोड (Pornographic photos) करून जिल्ह्यातील एका नगरपरिषदेतील (Municipal Council)अधिकार्‍याच्या पत्नीची (Wife of the officer) बदनामी (Defamation) केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याप्रकरणी शुक्रवारी अज्ञात व्यक्तीविरोधात सायबर पोलीसात गुन्हा (Crime in cyber police) दाखल करण्यात आला आहे.

- Advertisement -

सायबर पोलिसात दाखल तक्रारीनुसार, जळगाव जिल्ह्यातील एका नगरपरिषदेत मुख्याधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या अधिकार्‍याच्या पत्नीचे अश्‍लील फोटो तयार करुन ते फेसबुकवर प्रसारीत करण्यात आले. संशयीताने बनावट फेसबुक खाते तयार करुन ते वेगवेगळे फोटो अपलोड केल्याचेही निदर्शनास आले.

कुणीतरी बदनामी करत असल्याची खात्री होवून प्रकार समोर आल्यानंतर संबंधीत अधिकार्‍यांनी याबाबत तातडीने जळगाव सायबर पोलिसात तक्रार दिली. या तक्रारीवरुन अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक लिलाधार कानडे करीत आहेत.

- Advertisment -

ताज्या बातम्या