Sunday, May 19, 2024
Homeनाशिकनाशिकच्या संरक्षण विभागातील लेखा कार्यालयाचा डॉ. महेश दळे यांनी स्वीकारला पदभार

नाशिकच्या संरक्षण विभागातील लेखा कार्यालयाचा डॉ. महेश दळे यांनी स्वीकारला पदभार

नाशिक | प्रतिनिधी Nashik

भारत सरकारच्या संरक्षण विभाग अंतर्गत, लेखा नगर नाशिक स्थित वेतन लेखा कार्यालयाचा कार्यभार डॉ. महेश भागवत दळे, रक्षा लेखा अप्पर नियंत्रक यांनी सोनिला राजेश राव रक्षा लेखा सहाय्यक नियंत्रक यांच्याकडून पदभार स्वीकारला.

- Advertisement -

सदर वेतन लेखा कार्यालयात, संरक्षण विभागातील विशेषता तोफखाना आणि तोफखाना विमान कोरच्या अन्य श्रेणीच्या विविध पदावरील जवानाच्या पगार आणि भत्यांचा लेखाजोखा आणि अंकेक्षणाचे कार्य होत असते.

डॉ. महेश भागवत दळे हे भारतीय रक्षा लेखा सेवेच्या २०१० च्या बॅचचे कार्यक्षम आणि धडाधडीचे अधिकारी म्हणून विभागात ओळखले जातात. वित्तीय सेवा कार्यात त्यांचा कामाचा झपाटा आणि वक्तशिर पणा नेहमीच आदराचा विषय आहे. आयुष मंत्रालय मार्फत भारत सरकारच्या सर्वच कार्यालयात राबवण्यात येत असलेल्या “दररोज ध्यान” योजने अंतगर्त सर्व कार्यक्रमात यांचा सिहांचा वाटा असतो. डॉ. महेश दळे हे आयुर्वेदचार्य असून शल्यतंत्राची पदव्युत्तर पदवी त्यांनी प्राप्त केली आहे.

नाशिक स्थित संरक्षण विभागाच्या सर्व आस्थापनांना वित्तीय सल्लागार म्हणून ही त्यांच्याकडे विशेष पदभार, रक्षा लेखा प्रधान नियंत्रक पुणे यांनी सोपवला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या