Thursday, May 22, 2025
Homeदेश विदेशदिल्लीत CRPF च्या शाळेजवळ मोठा स्फोट, लोकांमध्ये भीती अन् गोंधळाचे वातावरण

दिल्लीत CRPF च्या शाळेजवळ मोठा स्फोट, लोकांमध्ये भीती अन् गोंधळाचे वातावरण

दिल्ली | Delhi

- Advertisement -

दिल्लीतील रोहिणी इथे प्रशांत विहार परिसरात स्फोट झाल्याची घटना घडली आहे. सीआरपीएफ शाळेजवळ हा स्फोट झाला आहे. स्फोटानंतर परिसरात मोठा गोंधळ उडाला असून तणावाचं वातावरण आहे.

ही घटना आज सकाळी ७.५० च्या सुमारास घडली. स्फोट इतका मोठा होता की परिसरातील काही गाड्यांच्या काचा फुटल्या. ही शाळा CRPF ची असल्यानं या घटनेनंतर यंत्रणा पूर्ण अलर्ट झाल्या असून, दिल्ली पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे. सुदैवाची बाब म्हणजे यामध्ये कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

समोर आलेल्या माहितीनुसार, प्रशांत विहार परिसरात स्फोटाचा मोठा आवाज ऐकू आला. दिल्ली पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून या प्रकरणाचा तपास सुरू केला. एफएसएलची टीमही तातडीने घटनास्थळी पोहोचली. स्थानिक डीसीपी अमित गोयल यांनी या घटनेची माहिती दिली. हा स्फोट दहशतवादी हल्ला होता की नाही? हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

संपादकीय : २२ मे २०२५ – शुगर बोर्डचा स्वागतार्ह पुढाकार

0
लहान मुलांमध्ये वाढता मधुमेह हा सामाजिक चिंतेचा विषय आहे. यावर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून सीबीएसईने त्यांच्याशी संलग्न शाळांमध्ये ‘शुगर बोर्ड’ स्थापन करण्याचा निर्णय नुकताच जाहीर...