Wednesday, January 7, 2026
Homeदेश विदेशदिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी रेखा गुप्ता; भाजपने महिला नेत्याला दिली संधी

दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी रेखा गुप्ता; भाजपने महिला नेत्याला दिली संधी

नवी दिल्ली | New Delhi

गेल्या 10 दिवसांपासून दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाबाबत (Delhi CM) चर्चा सुरू होती. दिल्लीतील मुख्यमंत्रीपदाची माळ कोणाच्या गळ्यात पडणार याकडे देशाचे लक्ष लागले होते. दिल्लीमध्ये भाजपने (BJP) आपच्या गडाला सुरुंग लावत सत्ता मिळवली. तब्बल 27 वर्षांनंतर दिल्लीमध्ये भाजपची सत्ता आली. दिल्लीचे नवे मुख्यमंत्री कोण असणार याबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली होती. अखेर नव्या मुख्यमंत्र्यांचं नाव आता समोर आले आहे. रेखा गुप्ता (Rekha Gupta) यांनी भाजप आमदारांचा गटनेता म्हणून घोषित करण्यात आले. तसेच, दिल्लीच्या भाजप प्रदेशाध्यक्षांनी रेखा गुप्ता ह्याच उद्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतील असेही जाहीर केले आहे.

- Advertisement -

दिल्लीसाठी महिला नेतृत्वाला संधी देत भाजपने लाडक्या बहिणींची मनं जिंकली आहेत. दिल्लीतील रामलीला मैदानावर भाजपच्या आणि दिल्लीच्या नव्या मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा संपन्न होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींसह (PM Narendra Modi) दिग्गज नेते या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. महाराष्ट्रातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadnavis) आणि दोन्ही उपमुख्यमंत्री देखील या सोहळ्यासाठी आजच दिल्लीला जाणार असल्याची माहिती आहे.

YouTube video player

रेखा गुप्ता (Rekha Gupta) ह्या आरएसएसच्या सक्रीय सभासद असून शालीमार बाग विधानसभेच्या आमदार आहेत. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी आम आदमी पक्षाच्या उमेदवार वंदना कुमारी यांचा 29 हजार 595 मतांनी पराभव केला आहे.

ताज्या बातम्या

भरदिवसा भरवस्तीत चोरट्यांनी ‘धूमस्टाईल’ने साडेपाच तोळ्यांचे गंठण लांबवले

0
संगमनेर । प्रतिनिधी संगमनेर शहरातील गजबजलेल्या गणेशनगर परिसरात भरदुपारी एका महिलेच्या गळ्यातील सोन्याचे दागिने चोरट्यांनी ओरबाडून नेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. सोमवारी दुपारी सव्वातीन ते...