Friday, May 3, 2024
Homeदेश विदेशDelhi MCD Election Result : दिल्ली महापालिकेवर 'आप'चा झेंडा, 'भाजप'ची १५ वर्षांची...

Delhi MCD Election Result : दिल्ली महापालिकेवर ‘आप’चा झेंडा, ‘भाजप’ची १५ वर्षांची सत्ता संपुष्टात

दिल्ली | Delhi

दिल्लीतील महानगरपालिकेच्या निवडणुकीत आम आदमी पार्टीनं मोठी मुसंडी मारत १३४ जागांवर विजय मिळवत सत्ताधारी भाजपची गेल्या १५ वर्षांपासूनची सत्ता खालसा केली आहे.

- Advertisement -

गेल्या १५ वर्षांपासून दिल्लीतील महापालिकेत भाजपची सत्ता आहे. यावेळी शहरातील तिन्ही महापालिकांचं विलिनीकरण करण्यात आल्यानंतर ही निवडणूक भाजप आणि आम आदमी पार्टीसाठी प्रतिष्ठेची झाली होती. परंतु दिल्लीतील पायाभूत सुविधांच्या कामांचा दावा करत आपनं दिल्लीतील महापालिकेच्या निवडणुकीत बाजी मारली आहे.

दिल्ली महापालिकेच्या २५० जागांसाठी ४ डिसेंबर रोजी मतदान झालं होतं. तर आज (७ डिसेंबर) मतमोजणी पार पडत आहे. या निवडणुकीत २५० जागांसाठी एकूण १३४९ उमेदवार मैदानात होते. दिल्ली महापालिकेवर गेल्या १५ वर्षांपासून भाजपची सत्ता होती. मात्र यंदा आम आदमी पक्षाला दिल्ली महापालिकेची सत्ता काबीज करण्यात यश आलं आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या