नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्यांवर पोलिसांनी अमानुष लाठीचार्ज आणि मारहाण केल्याचा गंभीर आरोप जखमी आंदोलकांनी केला आहे. राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेत आदोलकांची व्याथा सर्वांसमोर आणली. काही आंदोलकांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण, प्रायव्हेट पार्टला मारहाण आणि मोबाईल फोन हिसकावून घेतल्याचा दावा केला आहे. राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेत आदोलकांची व्याथा सर्वांसमोर आणली. आंदोलक विद्यार्थ्यांनी दिल्ली पोलिसांवर गंभीर आरोप केले. “आम्ही शांततेत आंदोलन करत होतो, तरीही पोलिसांनी आम्हाला बेदम मारहाण केली,” अशी आपबिती पीडितांनी माध्यमांशी बोलताना सांगितली.
पोलीस म्हणाले दिल्ली पोलीस तुमचे बाप आहे का?
विद्यार्थिनी म्हणाली, “पोलिसांनी विचारले, ‘दिल्ली पोलीस तुझे वडील आहेत का?'” पत्रकार परिषदेत बोलणाऱ्या पहिल्या विद्यार्थ्यांपैकी एकाने आरोप केला की, दिल्ली पोलिसांनी तिला अमानुष वागणूक दिली. विद्यार्थिनीच्या म्हणण्यानुसार, पोलिसांनी तिला ‘दिल्ली पोलीस तुझे वडील आहेत का?’ असे म्हणायला सांगितले. राहुल गांधींनी तिला विचारले की, तिला भीती वाटली का. विद्यार्थिनीने उत्तर दिले की, तिला सुरुवातीला भीती वाटली होती, पण आता वाटत नाही.
आता कुठे गेला तुमचा नेता?
दिल्लीतील आंदोलक केरळाची आदिरा यांनी पोलिसांच्या दादागिरीवर तीव्र संताप व्यक्त केला. त्या म्हणाल्या, “सुमारे ७ ते ८ पोलिसांनी मिळून आम्हाला घेरले आणि मारहाण केली. चंचल नावाच्या महिला कॉन्स्टेबलने तर अत्यंत क्रूरपणे मारले. मारहाण करताना ‘आता कुठे गेला तुमचा नेता?’ असा सवाल विचारत त्या आम्हाला मारत होत्या.”
पोलिसांनी आमचा गळा दाबला, रस्त्यावरुन फरफटत नेले
इतर आंदोलकांनीही पोलिसांच्या अमानुष कृत्याचा पाढा वाचला. “पोलिसांनी आमचा गळा दाबला, काठ्यांनी मारहाण करत रस्त्यावरून फरफटत नेले. एवढेच नाही तर ७ ते ८ जणांनी पकडून लाथा-बुक्क्यांनी मारले आणि प्रायव्हेट पार्टवरही गंभीर वार केले. आमचे केस ओढले” असा धक्कादायक आरोप जखमी आंदोलकांनी केला आहे.
आंदोलक धर्मेंद्र यांनी कोठडीत असताना मारहाण झाल्याचा आरोपही केला आहे. त्यांना लाथा बुक्क्यांनी मारहाण करण्यात आली आणि कानशिलात लगावण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. धर्मेंद्र यांच्या म्हणण्यानुसार, एका पोलिसाने त्यांना सांगितले की, त्यांच्यासोबत कितीही नेते असले तरी कोणीही त्यांच्या मदतीला येणार नाही. त्यांनी असाही आरोप केला की, पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर पैशांसाठी आंदोलन करत असल्याचा आरोप केला. धर्मेंद्र म्हणाले की, त्यावेळी त्यांना भीती वाटली होती, पण आता ते मागे हटणार नाहीत.
आमचे फोन काढून घेतले जात होते. फोनचा पासवर्ड विचारून सर्वकाही फोन तपासला जात होता. काही लोकांचे फोन माघारीही दिला नाही. शिविगाळ दिली. धमक्याही दिल्या. आमच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. डिटेनशनमध्ये मारले जातेय, शिव्या दिल्या जात आहे. वेगवेगळे गुन्हे दाखल केल्याचा आरोप विद्यार्थ्यांनी केले.




