Wednesday, November 4, 2026
HomeनाशिकNashik MC News : भाजपकडून स्वीकृत नगरसेवकपदासाठी 'या' सहा जणांना संधी; ठाकरे...

Nashik MC News : भाजपकडून स्वीकृत नगरसेवकपदासाठी ‘या’ सहा जणांना संधी; ठाकरे सेनेच्या एकतर्फी निर्णयामुळे काँग्रेस नाराज?

नाशिक | Nashik

महानगरपालिकेतील (Municipal Corporation) १० स्वीकृत नगरसेवक पदांच्या नियुक्तीची प्रक्रिया आज (बुधवार ४ नोव्हेंबर) रोजी पार पडत आहे. मंगळवारी (दि.०३) रोजी ठाकरे गटाने स्वीकृत नगरसेवकपदासाठी पक्षाचे ज्येष्ठ नेते दत्ता गायकवाड यांचे चिंरजीव हेमंत गायकवाड आणि एकनिष्ठ शिवसैनिक बाबा गायकवाड यांची नावे अंतिम केली होती. हे दोघेही नगरसेवकपदाचा ५ वर्षांचा कार्यकाल पूर्ण करणार आहेत. त्यानंतर भाजप आणि शिंदे गटाकडून कुणाला संधी दिली जाणार? याची उत्सुकता लागून राहिली होती.

- Advertisement -

हे देखील वाचा : Nashik MC News : शिंदेंच्या शिवसेनेकडून स्वीकृत नगरसेवकपदासाठी ‘यांची’ नावे अंतिम; भाजपकडून कुणाला संधी?

यानंतर शिंदे गटाने (Shinde Group) स्वीकृत नगरसेवकपदासाठी बाबुराव आढाव आणि राजू लवटे यांना संधी देण्याचा निर्णय घेतला. याबाबतची माहिती पक्षाचे महापालिकेतील गटनेते अजय बोरस्ते यांनी दिली. त्यानंतर या दोघांनीही आपला अर्ज महापालिका आयुक्त मनीषा खत्री यांच्याकडे दाखल केला. शिवसेना शिंदे गटाकडे २ जागांसाठी तब्बल ७४ इच्छुक होते. त्यामधून या दोघांची नावे अंतिम झाली असून, दोघांना स्वीकृतसाठी एक वर्षांचा कालावधी मिळणार आहे.

दरम्यान आता भाजपने (BJP) देखील आपल्या स्वीकृत नगरसेवकांची नावे जाहीर केली आहेत. यात भाजप प्रवक्ते अजित चव्हाण, नामकोचे माजी चेअरमन तथा व्ही.एन. नाईक शिक्षण संस्थेचे सरचिटणीस हेमंत धात्रक, संदीप लेनकर, महिला पदाधिकारी रोहिणी नायडू, रामहरी सभेराव आणि चंद्रशेखर पंचाक्षरी यांचा समावेश आहे. भाजपने शिंदे सेनेप्रमाणेच या सहाही जणांना स्वीकृतसाठी एक वर्षांचा कालावधी देण्याचा निर्णय घेतला आहे.

हे देखील वाचा : Nashik MC News : महापालिकेच्या स्वीकृत नगरसेवकांचा आज फैसला; ठाकरे सेनेची एकतर्फी फलंदाजी, काँग्रेसमध्ये नाराजी

कोणाच्या वाट्याला किती जागा?

नाशिक महापालिकेच्या स्वीकृत नगरसेवकपदाच्या १० जागांपैकी भाजपच्या वाट्याला ६, शिंदे सेनेला २ आणि ठाकरे सेना-काँग्रेस आघाडीला २ जागा मिळाल्या आहेत. आघाडीच्या वाट्याला आलेल्या २ जागांपैकी १ जागा मिळावी अशी काँग्रेसची (Congress) मागणी होती. मात्र, ठाकरे सेनेचे गटनेते केशव पोरजे यांनी मंगळवारी आयुक्त मनीषा खत्री यांची भेट घेऊन हेमंत गायकवाड आणि बाबा गायकवाड या दोघांच्या नावांचे अर्ज सादर केले. ठाकरे सेनेच्या या एकतर्फी निर्णयामुळे काँग्रेस नगरसेवकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे.

ठाकरे गट, काँग्रेसचे नगरसेवक भाजपच्या संपर्कात?

दरम्यान ठाकरे सेनेच्या भूमिकेमुळे दुखावलेले काँग्रेसचे काही नगरसेवक आणि ठाकरे गटातील काही असंतुष्ट नगरसेवक भाजपच्या संपर्कात असल्याची जोरदार चर्चा आहे. यातील काही नगरसेवकांनी मुंबईत जाऊन पालकमंत्री गिरीश महाजन यांची भेट घेतल्याचे बोलले जाते.

ताज्या बातम्या