Tuesday, April 7, 2026
HomeनगरShirdi : शिर्डीच्या आकाशात विमानाचा थरार !; पुढे घडले असे काही…

Shirdi : शिर्डीच्या आकाशात विमानाचा थरार !; पुढे घडले असे काही…

नागरिकांमध्येही भीतीचे वातावरण पसरले

रांजणगाव देशमुख |वार्ताहर| Ranjangaon Deshmukh

दिल्लीहून शिर्डीच्या (Delhi to Shirdi Plane) दिशेने निघालेल्या इंडिगो कंपनीच्या विमानाचा सोमवारी रात्री मोठा थरार पाहायला मिळाला. खराब हवामान आणि कमी दृश्यमानतेमुळे काकडी येथील शिर्डी आंतरराष्ट्रीय विमानतळावर (Shirdi International Airport) उतरण्यास परवानगी न मिळाल्याने, या विमानाला तब्बल दोन तास हवेतच घिरट्या घालाव्या लागल्या. अखेर सुरक्षेच्या कारणास्तव या विमानाचे सुरत विमानतळावर (Surat Airport) इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले. या सर्व प्रकारामुळे विमानातील प्रवाशांसह येवला (Yeola) आणि वैजापूर (Vaijapur) तालुक्यातील नागरिकांमध्येही भीतीचे वातावरण पसरले होते.

- Advertisement -

सोमवारी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास हे विमान शिर्डीत उतरणार होते. मात्र, ढगाळ वातावरणामुळे लँडिंग शक्य झाले नाही. विमान नाशिकच्या येवला आणि संभाजीनगरच्या वैजापूर तालुक्यात अतिशय कमी उंचीवरून उडत असल्यामुळे स्थानिक नागरिकांनी आपत्कालीन यंत्रणेला फोन केले. यामुळे पोलीस आणि महसूल प्रशासनाची एकच धावपळ उडाली. येवला प्रांताधिकारी बाबासाहेब गाढवे यांनी तात्काळ शिर्डी आणि नाशिक (Nashik) एटीसीशी संपर्क साधून माहिती घेतली, तेव्हा विमान सुरक्षित असल्याचे स्पष्ट झाले.

बराच वेळ हवेत घिरट्या घातल्यानंतरही हवामान न सुधारल्याने वैमानिकाने प्रसंगावधान राखून विमान सुरतच्या दिशेने वळवले. सुरतला सुरक्षित उतरल्यानंतर, हवामान निवळताच रात्री उशिरा 11 वाजता हे विमान पुन्हा शिर्डी विमानतळावर (Shirdi International Airport) दाखल झाले. या विमानात दिल्लीहून आलेले 167 प्रवासी होते, तर शिर्डीहून दिल्लीला जाणारे 141 प्रवासी विमानतळावर ताटकळत होते. रात्री 11:30 वाजता हे विमान दिल्लीकडे रवाना झाले. सुदैवाने सर्व प्रवासी सुखरूप असून सर्वांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.

सोमवारी रात्री हवामान खराब असल्याने आणि ढगाळ वातावरणामुळे विमान उतरण्यास तांत्रिक अडचण निर्माण झाली होती. वैमानिकाने सुरक्षेचा उपाय म्हणून विमान सुरत येथे सुरक्षित उतरवले. परिस्थिती सुधारल्यानंतर विमान पुन्हा शिर्डीत आले आणि येथील प्रवासी दिल्लीकडे रवाना झाले.
– कृष्णा पॉल, संचालक, शिर्डी विमानतळ.

ताज्या बातम्या

रोहित

शरद पवार, सुप्रिया सुळेंनंतर रोहित पवारांनी पार्थ पवारला दिली समज; म्हणाले,...

0
मुंबई | Mumbai'काँग्रेसचा डाऊनफॉल सुरू झाला आहे' असे म्हणत खासदार पार्थ पवार यांनी टीका केली होती. यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे ( शरदचंद्र पवार ) अध्यक्ष...