Monday, May 6, 2024
Homeधुळेरक्तदान जनजागृतीसाठी दिल्लीच्या किरण वर्माची पदयात्रा

रक्तदान जनजागृतीसाठी दिल्लीच्या किरण वर्माची पदयात्रा

धुळे Dhule। प्रतिनिधी

रक्तदान (Blood donation) सर्वश्रेष्ठ दान (best donation) आहे. रक्तदान करून आपण कोणाचा जीव वाचवु शकतो (Can save lives). त्यामुळे नागरीकांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदानासाठी पुढे यावे यासाठी दिल्ली येथील किरण वर्मा (Delhi’s Kiran Verma’s) हा तरुण 21 हजार किलोमीटरच्या पायी भ्रमंतीवर (Pad Yatra) निघाला आहे. त्याने नुकतीच जिल्हाधिकारी जलज शर्मा यांची भेट घेतली. या तरुणाने आतापर्यत पाच हजार कमी प्रवास पूर्ण केला आहे.

- Advertisement -

रक्तदान केल्याने शरीरावर कोणताही परिणाम होत नाही. असे असले तरी रक्तदानाविषयी समाजात अनेक गैरसमज आहे. त्यामुळे अनेक जण रक्तदान करण्यासाठी पुढे येत नाही. ही बाब लक्षात घेऊन रक्तदानावर जागृती करण्यासाठी किरण शर्मा हा तरुण पायी भ्रमंतीवर निघाला आहे. तो देशातील वेगवेगळ्या राज्यातील विविध जिल्ह्यात जावून रक्तदानाबाबत जनजागृती करत आहे.

त्यानूसार तो शहरात आला होता. त्याने जिल्हाधिकारी जलज शर्मा यांची भेट घेतली. किरण वर्माने 28 डिसेंबर 2021 रोजी केरळमधून पदयात्रेला सुरूवात केली. तो 5 हजार 400 किलोमीटरची पदयात्रा करून शहरात आला.

21 हजार किलोमीटर पायी भ्रमंती करण्यासाठी त्याला किमान दोन वर्ष लागतील. या उपकमाच्या माध्यमातून किरण पाच कोटी नागरीकांना रक्तदानाचे महत्त्व पटवून देणार आहे.

नागरिकांनी रक्तदान करण्यासाठी पुढे यावे, रक्तदानामुळे शरीराला कोणतेही नुकसान होत नाही. रक्तदान केल्याने कुणाचा तरी जीव वाचतो त्यामुळे रक्तदान करावे, असे आवाहन शर्मा याने केले.

अशी मिळाली प्रेरणा

देशात रोज रक्त न मिळाल्याने 12 हजार नागरीकांचा मृत्यू होतो. कोरोनाच्या काळातही त्यामुळे अनेकांचा मृत्यू झाला. तेव्हा सर्वांना प्लाझ्माचे महत्त्व समजले. त्यामुळे देशात रक्तदानाबाबत जनजागृती करावी, हा विचार मनात आल्याने जनजागृतीसाठी देशभरात पायी भ्रमंती करत असल्याचेही किरण वर्मा याने सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या