Thursday, May 2, 2024
Homeनाशिक...तर होमगार्ड्सला मानधनही मिळेल आणि उद्देशही साध्य होईल

…तर होमगार्ड्सला मानधनही मिळेल आणि उद्देशही साध्य होईल

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

शहरात नो हेल्मेट नो पेट्रोल (no helmet no petrol) उपक्रमाची अंमलबजावणी होत आहे. प्रत्येक पंपावर पोलिसांऐवजी (police) होमगार्डची (homeguard) नियुक्ती करण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन होमगार्ड विकास समितीचे उत्तर महाराष्ट्र प्रमुख नितीन गुणवंत (Nitin Gunwant) यांनी पोलीस आयुक्त दीपक पांडेय (Deepak Pandey) यांना दिले आहे…

- Advertisement -

शहरात स्वातंत्र्यदिनाच्या (Independence Day) दिवशी उद्घाटन झालेल्या नो हेल्मेट नो पेट्रोल या मोहिमेने नागरिकांनी हेल्मेट वापरण्यास सुरुवात केली आहे. मात्र, प्रत्येक पेट्रोल पंपावर एका पोलिसाची नेमणूक करण्यात आलेली आहे.

या पोलिसांऐवजी जर त्या ठिकाणी होमगार्डची नियुक्ती झाली तर त्यांनाही मानधन मिळेल आणि पोलिसांनाही त्यांच्या कामावर लक्ष केंद्रित करता येईल असा दुहेरी हेतू साध्य होईल, असे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या