Friday, May 3, 2024
Homeनाशिकरद्द करा, रद्द करा पोलिस अधीक्षकांची बदली रद्द करा!

रद्द करा, रद्द करा पोलिस अधीक्षकांची बदली रद्द करा!

नाशिक | प्रतिनिधी | Nashik

जिल्हा पोलीस अधीक्षक सचिन पाटील (Sachin Patil) यांची बदली रद्द करण्यासाठी शहरात पोस्टर्स लागले आहेत. ‘आम्ही सारे शेतकरी सामान्य नाशिककर’ मंचतर्फे पालकमंत्री छगन भुजबळ (Guardian Minister Chhagan Bhujbal) यांना निवेदन देखील देण्यात आले आहे….

- Advertisement -

मंचतर्फे यांच्या बदलीमागे, शेतकऱ्यांना फसविणारी चांडाळ चौकडी रोलेटचा जुगार चालविणारे विविध प्रकारचे अवैध धंदे चालक, गुटखा आणि रेती तसेच भुमाफीया आणि या सर्व अवैध प्रवृत्तींना अभय देणारे राजकारण कारणीभूत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

निवेदनात म्हटले आहे की, गेल्यावर्षी सप्टेंबर २०२० मध्ये नाशिकचे पोलीस अधिक्षक म्हणून सचिन पाटील या यांनी पदभार स्वीकारल्यानंतर जिल्ह्याची कायदा सुव्यवस्था अबाधीत ठेवण्यासाठी कुणाचाही मुलाहिजा न ठेवता कठोर पाऊले उचलली.

त्यातून काही मंडळींचे हितसंबंध टोकाचे दुःखावले गेल्याने त्यांच्या बदलीचे षडयंत्र यशस्वीपणे राबवून ते अंमलातही आणले गेले. अवघ्या दहा अकरा महिन्यात सचिन पाटील यांच्यासारखा कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी या जिल्ह्यातून कार्यकाल पुर्ण होण्याआधीच बदलून जात असल्याने जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात राहणारा समान्य माणूस तसेच शेतकरी वर्ग प्रचंड नाराज आहे.

आपण अग्रक्रमाने मान्य करून सचिन पाटील यांची बदली तात्काळ रद्द करून नाशिक जिल्ह्याला न्याय द्यावा, अन्यथा इच्छा नसतानाही जिल्ह्यातील शेतकरी आणि सामान्य जनतेला रस्त्यावर येऊन तीव्र आंदोलन छेडावे लागेल, असा इशारा पालकमंत्री छगन भुजबळ यांना दिलेल्या निवेदनात देण्यात आला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या