Friday, May 3, 2024
Homeनाशिकमौजे सुकेणेला पूर्णवेळ ग्रामसेवक देण्याची मागणी

मौजे सुकेणेला पूर्णवेळ ग्रामसेवक देण्याची मागणी

कसबे सुकेणे। Kasbe sukene (वार्ताहर)

मौजे सुकेणे गावाचा होत असलेला विस्तार, ग्रामस्थांची वाढलेली कामे आणि ग्रामसेवकाची पूर्णवेळ नसलेली उपस्थिती यामुळे नागरिकांना नानाविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे मौजे सुकेणे गावाला पूर्णवेळ ग्रामसेवक द्यावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून होऊ लागली आहे.

- Advertisement -

सध्या मौजे सुकेणे गावाबरोबरच इतर एक ते दोन गावे मिळून ग्रामसेवक दिला जात आहे. आठवड्यातून कधीतरी ग्रामसेवक सुकेणेला हजेरी लावतात.

सध्या येथे कार्यरत ग्रामसेवक सेवानिवृत्तीच्या टप्प्यावर आहे. त्यामुळे बर्‍याच वेळा ते गैरहजर किंवा रजेवर राहतात. कधी विचारणा केली असता ते कधी मीटिंगला आहे तर कधी या गावाला आहेत, अशी कारणे देतात.

त्यामुळे ग्रामस्थ त्रस्त असून स्वतंत्र व पूर्णवेळ ग्रामसेवक मिळावा, अशी मागणी मौजे सुकेणे ग्रामस्थांनी केली आहे. ग्रामसेवकाअभावी विविध दाखल्यांसाठी नागरिकांना नानाविध समस्यांचा सामना करावा लागत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या