Saturday, January 24, 2026
Homeब्रेकिंग न्यूजसिंहस्थ कुंभमेळ्यासाठी निधी उपलब्ध करून द्या- प्रविण तिदमे यांची मागणी

सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी निधी उपलब्ध करून द्या- प्रविण तिदमे यांची मागणी

नवीन नाशिक | प्रतिनिधी New Nashik

नाशिक येथे शिवसेनेचे महानगरप्रमुख प्रवीण तिदमे यांनी २०२७ च्या सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी तातडीने निधी उपलब्ध करून देण्याची मागणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे आज केली आहे.

- Advertisement -

या निवेदनात नमूद केले आहे कि २०२७ मध्ये नाशिकमध्ये होणारा सिंहस्थ कुम्भ्मेल्यास  देशभरातील लाखो भाविक येणार आहेत. या मोठ्या धार्मिक सोहळ्यासाठी शहरात आवश्यक पायाभूत सुविधांची निर्मिती आणि विकास कामे वेळेत पूर्ण होणे अत्यंत महत्त्वाचे आहे. नाशिक महानगरपालिकेने कुंभमेळ्याच्या तयारीसाठी अनेक महत्त्वाचे पायाभूत सुविधा प्रकल्प हाती घेतले आहेत, ज्यात नवीन पूल बांधकाम, रस्ते रुंदीकरण आणि इतर नागरी सुविधांचा समावेश आहे.

YouTube video player

सध्या, नाशिक महानगरपालिकेने पूल बांधणीच्या सहा मोठ्या प्रकल्पांसाठी निविदा प्रसिद्ध केल्या आहेत, ज्यांचे एकत्रित अंदाजित मूल्य ₹१.१८ अब्ज (११८ कोटी रुपये ) पेक्षा जास्त आहे. महानगरपालिकेने आपल्या २०२५-२६ च्या अर्थसंकल्पात या कामांसाठी काही आर्थिक तरतूद केली असली तरी या प्रकल्पांचा एकूण आवाका महानगरपालिकेच्या सध्याच्या आर्थिक क्षमतेपेक्षा खूप मोठा असल्याचे तिदमे यांनी म्हटले आहे.

निविदा दस्तऐवजातही स्पष्टपणे नमूद केले आहे की, कामाची देयके “निधीच्या उपलब्धतेनुसार” दिली जातील. तसेच, संपूर्ण सिंहस्थ कुंभमेळा प्रकल्पाला अद्याप शासनाची औपचारिक मंजुरी मिळालेली नाही. यामुळे निधीच्या उपलब्धतेबाबत अनिश्चितता निर्माण झाली असून, प्रकल्पांना वेळेत पूर्ण होण्यास अडचण निर्माण होऊ शकते, अशी भीती तिदमे यांनी व्यक्त केली.

या पार्श्वभूमीवर, नाशिक शहरातील कुंभमेळा २०२७ यशस्वीपणे पार पाडण्यासाठी आणि भाविकांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी, महाराष्ट्र शासनाने नाशिक महानगरपालिकेला या महत्त्वाच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांसाठी तातडीने पुरेसा निधी उपलब्ध करून द्यावा, अशी विनंती निवेदनात करण्यात आली आहे.

या प्रकल्पांना राज्य शासनाकडून तातडीने आवश्यक निधी मिळावा, तसेच केंद्र सरकारकडूनही निधी मिळण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुढाकार घेऊन पाठपुरावा करावा, अशी आग्रही मागणी तिदमे यांनी केली आहे.

ताज्या बातम्या

‘देशदूत गंगापूररोड प्रॉपर्टी एक्स्पो’चे दिमाखदार उद्घाटन

0
नाशिक | प्रतिनिधी Nasik नाशिकमधील घरांचे स्वप्न पाहणाऱ्या नागरिकांसाठी हक्काचे व्यासपीठ ठरणाऱ्या दैनिक ‘देशदूत’ आयोजित ‘गंगापूररोड प्रॉपर्टी एक्स्पो २०२६’ चे आज (दि. २३ जानेवारी) उत्साही...