Monday, May 6, 2024
Homeधुळेअन्नधान्य, खाद्य पदार्थावरील जीएसटी रद्द करण्यासाठी धुळ्यात व्यापार्‍यांचे निर्दशने

अन्नधान्य, खाद्य पदार्थावरील जीएसटी रद्द करण्यासाठी धुळ्यात व्यापार्‍यांचे निर्दशने

धुळे Dhule । प्रतिनिधी

अन्नधान्य व खाद्य पदार्थावरील (food grains, food items) पाच टक्के जीएसटी (GST) त्वरीत रद्द करावी (Should be canceled immediately) यासाठी, असोसिएशन ऑफ बिजनेस अ‍ॅण्ड कॉमर्स, (Association of Business and Commerce,) धुळे ग्रेन पलसेस् अ‍ॅण्ड जॉगरी मर्चंटस् असोशिएशन (Dhule Grain Pulses and Joggery Merchants Association) व धुळे शहर किराणा व भुसार व्यापारी असोसिएशन (Dhule City Grocery and Bhusar Traders Association) यांच्या संयुक्त विद्यमाने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर (Collectorate) निर्दशने (Demonstrations) करण्यात आली.

- Advertisement -

याबाबत जिल्हाधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, भारत सरकारने अन्नधान्य व खाद्य पदार्थावर पाच टक्के जीएसटी आकारणी केलेली आहे. ज्यावेळी जीएसटी अंलबजावणी देशात लागू करण्यात आली आहे. त्यावेळी केंद्र सरकारने खाद्य पदार्थ वस्तूंवर जीएसटी आकारण्यात येणार नाही, असे सांगितले होते. मात्र 47 व्या जीएसटी काऊंसिलने अन्नधान्य व खाद्य पदार्थावर नॉन ब्रेडेड वस्तूंवर पाच टक्के जीएसटीची आकारणी केली आहे. ही अन्यायकारक आकारणी शासनाने त्वरीत रद्द करावी अशी मागणी करण्यात आली आहे.

याबाबत शहरातील सर्व व्यापार्‍यांतर्फे जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले. तसेच या प्रस्तावित कर आकरणी विरोधात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निर्दशने करण्यात आली.अन्नधान्य व खाद्य पदार्थावरील नॉन ब्रेडेड वस्तूंवर जीएसटी आकारण्याचा निर्णय घेतल्यास त्याचा फार मोठा परिणाम शेतकरी आणि सामान्य नागरिकांवर होणार असून त्याचा मोठा आर्थिक भुर्दंड त्यांना सोसावा लागणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या