Thursday, May 2, 2024
Homeनाशिकमनसेना सात पदाधिकाऱ्यांच्या तडीपारीला स्थगिती

मनसेना सात पदाधिकाऱ्यांच्या तडीपारीला स्थगिती

नाशिक | प्रतिनिधी ( Nashik )

राज ठाकरे ( MNS President Raj Thackeray ) यांच्या अल्टीमेटम नंतर नाशकात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्याकरिता सरकारवाडा पोलीस ठाण्यात ( Sarkarwad Police Station ) गुन्हा दाखल असलेल्या मनसेना पदाधिकाऱ्यांची तडीपारी स्थगितीची आदेश न्यायालयाने ( Court ) दिले.

- Advertisement -

मनसेना पदाधिकारी सचिन भोसले, मनोज घोडके,सत्यम खंडाळे,अमित गांगुर्डे,संतोष कोरडे,निखिल सरपोतदार,संजय देवरे यांना विशेष पोलीस पथक गुन्हे शाखा युनिट १ च्या पथकाने प्रतिबंधक कारवाई दरम्यान अटक करून त्यांच्या विरोधात सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता.

सदर मनसेना पदाधिकाऱ्यांवर 15 दिवसांच्या तडीपारीची कारवाई केली होती. मात्र त्यांनी त्याविरोधात न्यायालयात धाव घेतली असता न्यायमूर्ती एम.ए.शिंदे यांनी त्यांची तडीपारी स्थगिती दिली.

- Advertisment -

ताज्या बातम्या