Friday, May 3, 2024
HomeUncategorizedनाशिक विभागाचे पर्यटन गतिमान होईल

नाशिक विभागाचे पर्यटन गतिमान होईल

आगामी दोन ते तीन वर्षांत नाशिक विभागाच्या पर्यटन उद्योगाची गती चौपट होण्याची शक्यता आहे. आगामी पंचवीस वर्षांत नाशिक शहरासह तालुकास्तरावरही पर्यटनाला महत्त्व येईल. जगभरात पर्यटनाला जाण्यापेक्षा आता देशांतर्गत पर्यटन वाढण्याची शक्यता आहे.

कोविड आजाराने जगण्याचे तंत्र शिकवले आहे. हॉटेल व सेवा उद्योगांमध्ये येणार्‍या काळात मोठी संधी निर्माण होण्याची शक्यता आहे. तरुणऑनलाईन जॉब शोधण्याच्या मागे राहतील. ऑनलाईन सेवेमध्ये एका जागी स्थिर राहण्याची गरज राहणार नाही. त्यामुळे आपोआपच स्वतःच्या निवासाची मागणी ते बाजूला ठेवू शकतील.

- Advertisement -

घर घेणे म्हणजे त्याचा ससेमिरा मागे लागतो. ईएमआय भरणे आजच्या काळात कठीण जाणार आहे. ठराविक रूममध्ये बसून ऑनलाईन व्यवहार करण्यामध्ये अथवा वर्क फ्रॉम होम कल्चरमध्ये युवकांना जास्त रस आहे. त्यामुळे हॉस्पिटॅलिटीची गरज वाढेल. कोविड आजाराने जगायची उर्मी वाढवली आहे. आजचा जगण्याचा आनंद घेण्याकडे लोकांचा कल वाढू लागला आहे.

शहरांमध्ये मोठमोठ्या हॉटेल्सची मालिका येऊ घातली आहे. भविष्यात आणखीही हॉटेल्स उभारले जातील, मात्र त्याच प्रमाणात ग्राहकवर्गाची संख्याही वाढू लागल्याचे चित्र आहे.

आजाराचा प्रादुर्भाव मुंबई-पुण्यात जास्त आहे. त्या तुलनेत नाशिकला प्रमाण आटोक्यात आहे. त्यामुळे नाशिकला पसंती मिळत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे येणार्‍या काळात नाशिकमधील उद्योग गतिमान होणे शक्य होणार आहे.

ऑनलाईन फंडा सर्वच क्षेत्रात गतिमान आहे. ऑनलाईन फूडला मागणी वाढली आहे. अद्याप हॉटेल बंद असले तरी ऑनलाईनच्या माध्यमातून लोक हॉटेलच्या खाद्यपदार्थांचा आनंद घेत आहेत. एक नवे कल्चर जनसामान्यांमध्ये रूढ होत आहे. त्या

मुळे निश्चितच आगामी काळात ऑनलाईन खाद्यपदार्थांची रेलचेल राहणार आहे. सध्या नाशिक परिसरात मुंबई, पुण्याहून काही प्रमाणात लोक येत आहेत. मात्र गुजरात परिसरातील पर्यटकांमुळे व्यवसायाच्या संधीही दुपटीने वाढणार आहेत.

आगामी पंचवीस वर्षांत नाशिक शहरासह तालुकास्तरावरही पर्यटनाला महत्त्व येईल. जगभरात पर्यटनाला जाण्यापेक्षा आता देशांतर्गत पर्यटन वाढण्याची शक्यता आहे. त्यातून ग्रामीण व निसर्गाच्या सान्निध्यात जाण्याचा कल वाढला आहे.

येणारा 25 वर्षांचा काळ मोठा असला तरी दोन ते तीन वर्षांत नाशिक विभागाच्या पर्यटन उद्योगाची गती चौपट होण्याची शक्यता आहे भविष्यातील या संधींचा अंदाज घेऊनच आंतरराष्ट्रीय स्तरावरील अनेक हॉटेल्स नाशिकमध्ये स्थिरावत आहेत. त्यामुळे छोट्या व्यवसायिकांचे सक्षमीकरण होण्यास मदत मिळणार आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या