Thursday, May 2, 2024
Homeनगरसेवानिवृत्तीचे वेतन न मिळाल्याने इच्छा मरणाची परवानगी द्या

सेवानिवृत्तीचे वेतन न मिळाल्याने इच्छा मरणाची परवानगी द्या

गोंडेगाव |वार्ताहर| Gondegav

श्रीरामपूर तालुक्यातील गोंडेगाव येथील भिकाजी भाऊराव थोरात हे नगर शासकीय धान्य गोदामात सेवेत होते.

- Advertisement -

ते गेल्या 6 वर्षांपासून सेवानिवृत्त झाले. याबाबत त्यांनी वेळोवेळी प्रशासकीय पातळीवर पाठपुरावा केला, परंतु त्यांना अद्यापपोवतो सेवानिवृत्तीचे वेतन मिळालेले नाही. त्यामुळे त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना निवेदनाद्वारे इच्छा मरणाची परवानगी मिळावी, अशी मागणी केली आहे.

नगर येथील शासकीय धान्य गोदाम येथून थोरात हे मे 2014 ला सेवानिवृत्त झाले, त्यांनी सेवानिवृत्ती वेतन मिळावे, त्याबाबतचे सर्व कागदपत्रे संबंधित विभागाला दिली, तसेच ते गेल्या 6 वर्षांपासून आपल्याला सेवानिवृत्ती वेतन मिळावे म्हणून पाठपुरावा करत आहेत.

सेवा निवृत्ती वेतन कामी उच्च न्यायालय, औरंगाबाद खंडपीठ येथे 1591/2018 रोजी, फेब्रुवारी 2018 मध्ये सेवानिवृत्ती देणेबाबत निकाल देण्यात आलेला आहे. 2018 ला उच्च न्यायालयाचा निकाल लागल्यापासून श्री. थोरात हे जिल्हाधिकारी कार्यालय, अहमदनगर येथे पाठपुरावा करत असून, वेळोवेळी उडवाउडवीची उत्तरे दिली.

त्यावर त्यांचे उत्तर मला मिळालेले नसल्याने माझ्या मागणीचा कोणीही विचार करत नाही, असे थोरात यांनी निवेदनाद्वारे म्हटले आहे.

करोना काळात हलाखीची परिस्थिती निर्माण झाली आहे. मला सध्या वयोमानाने कोणतेही काम होत नाही, सध्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. प्रचंड मानसिक तणाव आहे. सेवानिवृत्ती वेतन देणेबाबत संबंधित अधिकारी यांना योग्य ते आदेश देण्यात यावेत, अशी त्यांनी मागणी केली असून महसूलमंत्री बाळासाहेब थोरात व जिल्हाधिकारी कार्यालय यांना निवेदन देण्यात आले आहे.

मी मुंबई येथे जाऊन श्रीरामपूरचे आ.लहू कानडे यांची दोन ते तीन महिन्यांपूर्वी भेट घेतली असता भेटी दरम्यान, सेवानिवृत्तीचे वेतन मिळावे विनंती केली.आ.कानडे यांनी संबंधित जिल्हाधिकारी कार्यालय यांना याबाबत दखल घ्यावी अशी पत्राद्वारे सूचना केली. पण,त्यावर संबंधित अधिकार्‍याकडून अद्यापपर्यंत कोणतीही कारवाई झालेली नसल्याने याबाबत वेतनाचा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी भिकाजी थोरात यांनी केली आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या