Friday, April 3, 2026
Homeनाशिककळवणचा कायापालट हेच अंतिम ध्येय

कळवणचा कायापालट हेच अंतिम ध्येय

कळवण । प्रतिनिधी

गेल्या पाच वर्षांत कळवण शहराच्या विकासासाठी शासनस्तरावरून विविध योजनांच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिल्याने शहरात बदल झालेला दिसून येतो. गटनेते कौतिक पगार यांच्यासारखे सक्षम नेतृत्व नगरपंचायतीला लाभल्याने शहराचा चौफेरे विकास झाला. लोकप्रतिनिधी या नात्याने कळवण शहराच्या विकासासाठी मी कटिबद्ध असून तेच अंतिम ध्येय आहे. त्यामुळे विकासकामांसाठी निधी कमी पडू देणार नाही, अशी ग्वाही आ. नितीन पवार यांनी दिली.

- Advertisement -

आ. पवार यांच्या प्रयत्नातून कळवण नगरपंचायतीला महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान योजनेंतर्गत निधी मिळाला आहे. त्याअंतर्गत विविध विकासकामांचे भूमिपूजन आ. पवार यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

अध्यक्षस्थानी कळवण नगरपंचायतीचे गटनेते कौतिक पगार होते. प्रमुख पाहुणे म्हणून कळवण बाजार समितीचे सभापती धनंजय पवार, शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष देवीदास पवार, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष राजेंद्र भामरे, माजी सरपंच सुनील जैन, नगरसेवक जयेश पगार, अतुल पगार, बाळासाहेब जाधव, समता परिषद तालुकाध्यक्ष शशिकांत बागुल, भूषण पगार, राजेंद्र पगार, हरिश्चंद्र पगार, गौरव पगार, राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष जितेंद्र पगार आदी उपस्थित होते.

आ. पवार यांनी उपलब्ध करून दिलेल्या निधीतून कळवण शहरातील 17 प्रभागांत 55 कोटी रुपयांची विकासकामे पूर्ण झाली आहेत. नागरिकांच्या मागणीनुसार सिमेंट काँक्रिटीकरण, डांबरीकरण रस्ते विकासकामांना प्राधान्य देण्यात आले आहे.

मोठादेव नाला रस्त्याचे मजबुतीकरण, डॉ. सम्राट पवार हॉस्पिटल ते महावितरण कार्यालयदरम्यान वाहतुकीसाठी पूल, बायोगॅस प्रकल्प, आप्पा बुटे यांचे घर ते आठवडे बाजारपर्यंत पाईप गटार व रस्ता व बेहडी नदीपात्रातील सिमेंट बंधारा या विकासकामांचे भूमिपूजन आ. पवार यांच्या हस्ते व मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले. कळवण शहरातील प्रस्तावित विकासकामांसाठी 17 कोटी रुपये मंजूर झाले आहेत. कळवणकरांनी भविष्यात होऊ घातलेल्या नगरपंचायत निवडणुकीत अशीच साथ द्यावी, असे आवाहन गटनेते कौतिक पगार यांनी यावेळी नागरिकांशी बोलताना केले.

याप्रसंगी धनंजय पवार, देवीदास पवार, राजेंद्र भामरे यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमास सुभाष पगार, दिनकर पगार, देवराम पगार, रिंकू पगार, डॉ. सम्राट पवार, प्रतीक देवरे, बापूसाहेब खैरनार, जयराम पगार, रमेश पगार, अमोल मुर्तडक, रमेश शेवाळे, बापू पगार, अभिलाष पगार, किरण पगार, राम पगार, मुन्ना भामरे, गणेश भामरे, विजय काकुळते, डॉ. दीपक शेवाळे, लक्ष्मण पगार, भाऊसाहेब अहिरे, संदीप पगार, शाम मोरे, गणेश अहिरे आदी उपस्थित होते.

ताज्या बातम्या

Shirdi : खरातच्या पत्नीचे परदेशात पळून जाण्याचे मार्ग बंद

0
शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi भोंदूबाबा प्रकरणातील अटक आरोपींच्या तपासादरम्यान पतसंस्थांमधील आर्थिक व्यवहारांबाबत महत्त्वाची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी तपासाचा भाग म्हणून समता व जगदंबा नागरी सहकारी...