Friday, November 22, 2024
Homeब्रेकिंग न्यूजनांदगावचा विकास समीर भुजबळांकडून शक्य : सोनवणे

नांदगावचा विकास समीर भुजबळांकडून शक्य : सोनवणे

नांंदगाव । प्रतिनिधी Nandgaon

- Advertisement -

राज्यभरात दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जाणारा नांदगाव तालुका दुष्काळी तालुक्यातील यादीत नसावा हे विशेष आहे. प्रत्येक शेतापर्यंत पाटचारीने पाणी जावे, मतदारसंघाचा सर्वांगीण विकास व्हावा, तो विकास अपक्ष उमेदवार समीर भुजबळच करतील, याची खात्री आहे. त्यामुळेच मी भुजबळ यांना पाठिंबा दिला आहे, अशी स्पष्टोक्ती भगवान सोनवणे यांनी दिली.

भगवान सोनवणे म्हणाले की, नांदगाव मतदारसंघात चारही बाजूने धरणे असूनही कायम पाण्याचा तुटवडा आहे. जलसिंचनाच्या उपाययोजना व्हाव्यात, युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात, मेंढपाळ बांधवांना ‘अभय’ मिळावे, ऊसतोड मजुरांच्या मुलांना शिक्षणाच्या सोयी उपलब्ध व्हाव्यात, जनसामान्यांना शासकीय कार्यालयात आपल्याच कामासाठी माराव्या लागणार्‍या येरझर्‍या थांबाव्यात, शेतकर्‍याला चोवीस तास वीज मिळावी, आरोग्याच्या सुसज्ज सेवा मिळाव्यात, जिल्हा परिषद शाळा वाचाव्यात आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे मागील काळात मतदारसंघात वाढलेली दडपशाही संपून ती ‘हद्दपार’ व्हावी हे सर्व करण्याची क्षमता अपक्ष उमेदवार समीर भुजबळ यांच्यामध्ये आहे.

त्यामुळे त्यांना जाहीर पाठिंबा देत माझी उमेदवारी मी मागे घेतली आहे, असे सोनवणे यांनी सांगितले. भुजबळ हे नांदगावला निश्चितच प्रगतीच्या पथावर नेतील, याची मला ठाम खात्री आहे, असे म्हणत भगवान सोनवणे यांनी भुजबळांना पाठिंबा दिला आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या