Friday, May 3, 2024
Homeनगर‘ते’ 28 कोटी असे वापरा

‘ते’ 28 कोटी असे वापरा

अहमदनगर (प्रतिनिधी)- शास्तीमाफीतून जमा झालेल्या 28 कोटी रुपयांच्या निधीतून वार्डात विकास कामे हाती घ्यावीत.

जनतेचा कररुपी पैसा जनतेसाठीच लोकोपयोगी कामासाठी वापरावा, अशी मागणी विरोधी पक्षनेते संपत बारस्कर यांनी आयुक्तांकडे केली आहे. तसे न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे.

- Advertisement -

कोरोना संकट काळात महापालिकेची आर्थिक घडी विस्कटली. वर्षभरापासून वार्डात एकही विकास कामे होऊ शकले नाही. शास्तीमाफीमुळे महापालिकेच्या तिजोरीत 28 कोटी रूपयांचा निधी जमा झाला आहे. त्यातून महापालिकेला मोठा आर्थिक दिलासा मिळाला. शास्तीमाफीतून जमा झालेला पैसा हा जनतेचा आहे. त्यामुळे त्यातून जनतेसाठीच लोकोपयोगी कामे होणे गरजेचे आहे. वार्डातील विकास कामासाठी हा निधी राखीव ठेवावा अशी मागणी बारस्कर यांनी केली आहे. आयुक्त श्रीकांत मायकलवार यांनी या मागणीचा विचार करावा, तसे न झाल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यावतीने तीव्र आंदोलन उभारले जाईल असा इशारा बारस्कर यांनी दिला आहे.

‘ती’ आणि ‘ही’ मागणी

कोरोना महामारीच्या संकटात कोलमडून पडलेल्या नगरकरांना शास्तीमाफी मिळावी ही मागणी सर्वप्रथम राष्ट्रवादीने केली. आयुक्त मायकलवार यांनी 1 ते 30 नोव्हेंबर या काळात 75 टक्के शास्तीमाफीचा निर्णय घेतला. त्याचा लाभ घेत नगरकरांनी 28 कोटी रुपयांचा कर स्वत:हून महापालिकेच्या तिजोरीत भरला. जनतेचा पैसा जनतेच्याच सेवेसाठी वापरला गेला पाहिजे. वर्षभरापासून शहरात कोठेच विकास कामे झालेली नाहीत. त्यामुळे या पैशातून जनतेसाठीची विकास कामे व्हावी अशी मागणी आयुक्तांकडे केल्याचे विरोधी पक्षनेते बारस्कर यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या