Thursday, May 2, 2024
Homeमुख्य बातम्याविनाशकाले विपरीत बुद्धी; शिवसेना-संभाजी ब्रिगेड युतीवर देवेंद्र फडणवीसांचा टोला

विनाशकाले विपरीत बुद्धी; शिवसेना-संभाजी ब्रिगेड युतीवर देवेंद्र फडणवीसांचा टोला

मुंबई | Mumbai

शिवसेनेचे (Shivsena) बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath SHinde) यांनी पक्षामध्ये उभी फूट पाडत ४० आमदारांसहीत भाजपासोबत (BJP) सरकार स्थापन केल्यापासून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि बंडखोर आमदारांचा शिंदे गट असा संघर्ष सुरु आहे.

- Advertisement -

एकीकडे शिवसेनेला फुटीच्या राजकारणामुळे गळती लागलेली असतानाच दुसरीकडे आज शिवसेनेनं संभाजी ब्रिगेडसोबत (Shivsena Sambhaji Brigade alliance) युतीची घोषणा केली.

या युतीवर उपमुख्यमंत्री आणि राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. शिवसेना संभाजी ब्रिगेड युतीबद्दल विचारणा केली असता, फडणवीसांनी आपण केवळ एका वाक्यात उत्तर देणार असं सांगितलं. शिवसेना आणि संभाजी ब्रिगेड यांची युती म्हणजे विनाशकाले विपरीत बुद्धी असा टोला फडणवीसांनी लगावला आहे.

दरम्यान शिवसेना आणि संभाजी ब्रिगेडच्या या युतीवर मनसेने टीका केली आहे. मनसे आमदार राजू पाटील (raju patil) यांनी ट्वीट करत शिवसेनेला खोचक टोला लगावला आहे. सत्तेविना मती गेली, जो मिळेल त्याच्याशी युती केली…, असं ट्वीट करून राजू पाटील यांनी शिवसेनेला खोचक टोला लगावला आहे. युतीनंतर शिवसेनेवर भाजपकडून सडकून टीका होत असतानाच आता मनसेनेही या युतीवर जोरदार हल्ला चढवला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या