Sunday, March 30, 2025
Homeब्रेकिंग न्यूजदेवेंद्र फडणवीसांची उध्दव ठाकरे आणि शरद पवारांवर टीका; म्हणाले, शिवसेना काँग्रेसबरोबर…

देवेंद्र फडणवीसांची उध्दव ठाकरे आणि शरद पवारांवर टीका; म्हणाले, शिवसेना काँग्रेसबरोबर…

जळगाव | Jalgaon
लोकसभा निवडणूक किंवा पुढील दोन वर्षात अनेक प्रादेशिक पक्ष हे काँग्रेस बरोबर जाणार किंवा त्यातील काही पक्ष हे काँग्रेसमध्ये विलीन होण्याचा विचार करतील, खळबळजनक वक्तव्य शरद पवार यांनी केले. त्यांच्या या वक्तव्यानंतर राज्यातील राजकारणात चर्चांना उधाण आले. पवार यांच्या वक्तव्यावर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याबाबत वक्तव्य केले आहे.

“पराभव जवळ दिसू लागल्याने शरद पवारांनी असे वक्तव्य केले आहे. लोकसभेनंतर शरद पवारांचा पक्ष आणि ठाकरेंचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार आहे. बाळासाहेबांनी सांगितले होते, ज्यावेळेस काँग्रेसची युती करण्याची वेळ येईल त्यावेळेस मी माझे दुकान बंद करेन. या निवडणुकीनंतर त्यांची शिवसेना काँग्रेसबरोबर विलीन होणार आहे”, असे वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भाषणात केले.

- Advertisement -

हे ही वाचा : “दक्षिण भारतीय लोक आफ्रिकन…”; सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावर काँग्रेसचे स्पष्टीकरण

पुढे ते असे ही म्हणाले, यापूर्वीही शरद पवारांनी अनेकवेळा पक्ष तयार केला आणि अनेकवेळा काँग्रेसमध्ये गेले. त्यामुळे त्यांनी हा एक संकेत दिला आहे की, आता त्यांचा पक्ष चालवणे त्यांना शक्य होणार नाही. लोकसभा निवडणुकीनंतर शरद पवार साहेबांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन करतील, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

काय म्हणाले शरद पवार?
पुढील २ वर्षांत अनेक प्रादेशिक पक्ष काँग्रेसशी अधिक जवळीक साधतील किंवा त्यातील काहींना काँग्रेसमध्ये विलीन होण्याचा पर्याय त्यांच्या पक्षासाठी चांगला असेल असंही वाटू शकते. तसेच काँग्रेस आणि आमच्या विचारधारेत फारसा फरक नाही. आमच्या दोघांचीही विचारधारा गांधी-नेहरू यावर वाटचाल करत आहे, असे शरद पवार यांनी म्हटले आहे. तसेच माझ्या पक्षाच्या विलिनीकरणाबाबत सहकाऱ्यांसोबत चर्चा केल्याशिवाय मी काहीही सांगू शकत नाही. वैचारिकदृष्ट्या आम्ही काँग्रेसच्या जवळ आहोत. परंतु पुढील काळातील निर्णय आणि रणनीती ही सामूहिकपणे विचार करून घेतले जातील. आम्हाला नरेंद्र मोदींसोबत जुळवून घेणे आणि ते पचवणे कठीण आहे असेही शरद पवार म्हणालेत.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

PM Modi : राष्ट्रीय स्वंयसेवक संघ हा महान अक्षय वटवृक्ष; पंतप्रधान...

0
नागपूर । Nagpur पंतप्रधान नरेंद्र मोदी आज रविवारी नागपूर दौऱ्यावर आहेत. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी हे नागपुरातील विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी झालेत. यावेळी नरेंद्र मोदी यांच्या...