मुंबई | Mumbai
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत (Vidhansabha Election) महायुतीला (Mahayuti) स्पष्ट बहुमत मिळाले आहे. यात भाजपला १३२, शिवसेनेला ५७ आणि राष्ट्रवादीला ४१ जागा मिळाल्या आहेत. महायुतीत भाजपला (BJP) सर्वाधिक जागा मिळाल्याने त्यांचाच मुख्यमंत्री (CM) होणार असल्याचे स्पष्ट झाले होते, मात्र मुख्यमंत्रीपदाचा चेहरा ठरत नव्हता. अखेर आज भाजपची विधिमंडळ गटनेत्याची बैठक पार पडली असता यामध्ये देवेंद्र फडणवीस यांची एकमताने निवड करण्यात आली. त्यामुळे देवेंद्र फडणवीस राज्याचे पुढील मुख्यमंत्री होणार असून उद्या सायंकाळी ते मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत.
हे देखील वाचा : मोठी बातमी! भाजपच्या विधिमंडळ गटनेतेपदी देवेंद्र फडणवीसांची निवड
देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होणार असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर आज दुपारी साडे तीन वाजेदरम्यान महायुतीकडून राज्यपालांकडे (Governor) सत्तास्थापनेचा दावा केला जाणार आहे. त्यासाठी महायुतीतील तिनही पक्षांचे प्रमुख नेते म्हणजेच देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षाचे गटनते एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी पक्षाचे गटनेते अजित पवार हे राज्यपालांची भेट घेतील आणि त्यांच्याकडे सत्ता स्थापनेसाठीचे पत्र सादर करतील. मात्र, त्याआधी आज विधानभवनाच्या सेंट्रल हॉलमध्ये भाजपच्या झालेल्या बैठकीपूर्वीच देवेंद्र फडणवीस यांचीच मुख्यमंत्रीपदी निवड होणार असल्याचे संकेत मिळाल्याचे दिसून आले.
हे देखील वाचा : Maharashtra Politics : विधिमंडळात भाजपच्या कोअर कमिटीची बैठक सुरु
विधीमंडळाच्या सेंट्रल हॉलमध्ये या महत्त्वाच्या बैठकीपूर्वी सर्व १३२ आमदारांना सर्व एकसारखे फेटे बांधण्यात आले होते. भगव्या रंगाचा हा फेटा होता ज्याला सोनेरी रंगाची बारीक काठ होती. तर, तुऱ्यालाही सोनेरी रंगाची बारीक काठ होती. हे सर्व आमदार सेंट्रल हॉलमध्ये बसून वरिष्ठ नेत्यांच्या येण्याची प्रतिक्षा करत होते. भाजपच्या कोअर कमिटीची बैठक संपल्यावर जेव्हा इतर नेत्यांसोबत देवेंद्र फडणवीस विधीमंडळाच्या सेंट्रल हॉलकडे निघाले तेव्हा त्यांच्याही डोक्यावर फेटा बांधलेला होता. पण, हा फेटा इतर आमदारांच्या फेट्यापेक्षा खूप वेगळा होता. मात्र, फडणवीसांना जो फेटा बांधण्यात आला होता, तो अत्यंत आकर्षक होता.
हे देखील वाचा : Devendra Fadnavis: ते ‘पुन्हा आले’; जाणून घेऊया देवेंद्र फडणवीसांच्या निवडीसाठी ठरलेली महत्वाची कारणं
देवेंद्र फडणवीसांना बांधण्यात आलेल्या फेट्याचा रंग जरी सारखा असला तरी तो फेटा इतरांपेक्षा वेगळा होता. ज्याठिकाणी इतर आमदारांचे फेटे हे भगव्या रंगाचे आणि बारीक सोनेरी काठाचे होते. त्याठिकाणी फडणवीसांच्या फेट्याला मात्र मोठी सुवर्ण काठ होती. त्यांचा तुराही अत्यंत आकर्षक दिसत होता.फडणवीसांच्या फेट्याला मोठी सुवर्ण काठ होती आणि त्याला हिरव्या रंगाची बारीक काठ होती. त्यामुळे ते इतरांपेक्षा खूप वेगळे दिसत होते. कारण ज्यावेळी विधिमंडळाच्या सेंट्रल हॉलमध्ये फडणवीसांनी प्रवेश घेतला त्यावेळी तेच मुख्यमंत्री होणार याचे संकेत त्यांच्या या शानदार फेट्याने दिल्याचे पाहायला मिळाले.