Wednesday, January 15, 2025
Homeब्रेकिंग न्यूजMaharashtra Politics : विधिमंडळात भाजपच्या कोअर कमिटीची बैठक सुरु

Maharashtra Politics : विधिमंडळात भाजपच्या कोअर कमिटीची बैठक सुरु

महायुती आज राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा करणार

मुंबई | Mumbai

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा (Maharashra Vidhansabha Election) निकाल (Result) लागून आज १२ दिवस झाले तरी देखील राज्यात नवीन सरकार स्थापन झालेले नाही. त्यानंतर आज भाजप कोअर कमिटीची बैठक होणार असून या बैठकीत मुख्यमंत्रीपदाचा (CM Post) चेहरा घोषित केला जाणार आहे. कोअर कमिटी आणि विधीमंडळ पक्षाची बैठक (BJP Maharashtra Committee Meeting) आज विधानभवनात पार पडणार आहे. या बैठकीसाठी भाजप विधिमंडळ पक्ष कार्यालयात भाजपचे नेते दाखल झाले आहेत. या बैठकीसाठी भाजपचे निरीक्षक अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि विजय रुपाणी देखील विधानभवनात हजर झाले आहेत.

- Advertisement -

दुसरीकडे महायुतीकडून (Mahayuti) आज दुपारी ३.३० वाजता राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन (Governor C.P. Radhakrishnan) यांच्याकडे सत्तास्थापनेचा दावा करणार आहे. त्यामुळे मुंबईत आज महत्वाच्या घडामोडी घडताना पाहायला मिळणार आहे. महायुतीमध्ये मंत्रिपदाच्या वाटपावरून वाद सुरू होता. गृहमंत्रिपदावर भाजप आणि शिवसेना हे दोन्ही पक्ष आग्रही होते. भाजपने गृहमंत्रिपद मिळावे अशी मागणी केली होती.तर एकनाथ शिंदे हे देखील गृहमंत्रिपदावर ठाम होते. पण देवेंद्र फडणवीस यांनी एकनाथ शिंदे यांची भेट घेत समजूत काढण्याचा प्रयत्न केला. या भेटीनंतर एकनाथ शिंदे यांनी निर्णय बदलला असल्याची माहिती समोर आली आहे.तर देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री होणार असल्याचे आता जवळपास निश्चित झाले आहे.

तसेच देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या भेटीनंतर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी उपमुख्यमंत्रिपद स्विकारण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतची माहिती भाजपच्या वरिष्ठ नेत्याने दिली आहे. तर एकनाथ शिंदे यांना गृह खात्याऐवजी नगरविकास आणि आणखी एखादे महत्वपूर्ण खाते दिले जाणार आहे. तसेच उद्या मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांसोबत २० हून अधिक मंत्री देखील शपथ घेणार असल्याची माहिती समोर आली आहे.

शपथविधी सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी उपस्थित राहणार

महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची उद्या मुंबईमध्ये शपथविधी पार पडणार आहे. या शपथविधीच्या सोहळ्यासाठी मुंबईतील आझाद मैदानात भव्य दिव्य तयारी करण्यात आलेली आहे. या सोहळ्यात भगवा रंगाचा मोठ्या प्रमाणात वापर करण्यात आला आहे. सोहळ्यासाठी तीन वेगवेगळे स्टेज उभारण्यात आले असून हजारो उपस्थितांना बसण्याची व्यवस्था देखील करण्यात आलेली आहे. उद्याच्या शपथविधी सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) उपस्थित राहणार आहेत. त्यामुळेच आझाद मैदानाच्या आजूबाजूला मोठ्या प्रमाणात सुरक्षा व्यवस्था पुरवण्यात आली आहे.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या