Thursday, May 2, 2024
Homeमुख्य बातम्याबेळगावात महाराष्ट्राच्या वाहनांवर दगडफेक; देवेंद्र फडणवीसांचा थेट कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना फोन

बेळगावात महाराष्ट्राच्या वाहनांवर दगडफेक; देवेंद्र फडणवीसांचा थेट कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना फोन

मुंबई | Mumbai

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद आणखी चिघळला आहे. बेळगाव येथे महाराष्ट्रातील वाहनांवर हल्ला करण्यात आला आहे. कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी हा हल्ला केला आहे. हिरबागेवाडी टोलनाक्यावर ही घटना घडली आहे. या घटनेनंतर महाराष्ट्रातून संताप व्यक्त होत आहे.

- Advertisement -

या घटनेच्या पार्श्वभूमीवर आता महाराष्ट्रातून संतप्त प्रतिक्रिया उमटू लागल्याने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांना थेट फोन करून या घटनेबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. यानंतर कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी या घटनेत लक्ष घालून दोषींवर कठोर कारवाई केली जाईल, असे सांगितले. यासोबतच महाराष्ट्रातून येणार्‍या वाहनांना संरक्षण दिले जाईल, असेही त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याशी झालेल्या दूरध्वनी संभाषणात आश्वस्त केले आहे.

कर्नाटक-महाराष्ट्र सीमा प्रश्नासाठी राज्यातील दोन मंत्री चंद्रकांत पाटील आणि शंभूराज देसाई आज (6 डिसेंबर) कर्नाटकातील बेळगावला भेट देणार होते. त्याआधीच कर्नाटकाचे मुख्यमंत्र्यांनी बेळगावला न येण्याचा इशारा दिला होता. त्यानंतर सीमावाद चिघळू नये, म्हणून शंभूराज देसाई आणि चंद्रकांत पाटील यांचा दौरा तूर्त रद्द करण्यात आला. पण त्यानंतर आज कोल्हापुरातून कर्नाटकात जाणाऱ्या वाहनांवर कन्नड रक्षण वेदिके संघटनेच्या लोकांनी आज दगडफेक केली. महाराष्ट्र पासिंगच्या सहा ट्रकवर दगडफेक आणि शाईफेक करण्यात आली.

- Advertisment -

ताज्या बातम्या