Friday, May 16, 2025
Homeमुख्य बातम्याअजित पवार गटातील मंत्री शरद पवारांच्या भेटीला; फडणवीस म्हणाले, “जर ही भेट..”

अजित पवार गटातील मंत्री शरद पवारांच्या भेटीला; फडणवीस म्हणाले, “जर ही भेट..”

मुंबई | Mumbai

- Advertisement -

राष्ट्रवादीतून फुटून अजित पवार आणि त्यांच्या समर्थक आमदारांनी भाजपला समर्थन देण्याच्या घेतलेल्या निर्णयानंतर आज संपूर्ण दादा गटाने ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली. प्रफुल्ल पटेल आणि अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीच्या नवनिर्वाचित ८ मंत्र्यांनी शरद पवार यांचे आशीर्वाद घेतले. त्यावर आता राजकीय वर्तुळातून अनेक तर्क-वितर्क लावले जात आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भात प्रतिक्रिया दिली आहे.

मला याची काही कल्पना नाहीये. पण जर त्यांनी पवारसाहेबांची भेट घेतली असेल. त्यात वेगळं काही नाही. कारण वर्षानुवर्षे शरद पवार हे त्यांचे नेते राहिले आहेत. त्यामुळे जर ही भेट झाली असेल तर त्यात काही वावगं आहे, असं मला वाटत नाही, असं देवेंद्र फडणवीस म्हणालेत. या मंत्र्यांनी शरद पवार यांची भेट घेण्यामागे काही राजकीय समीकरणं आहेत, असं वाटतं का? असा प्रश्न विचारण्यात आला. तेव्हा मला त्याची काही कल्पना नाही, असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

शिवसेना

Shivsena-MNS Alliance: शिवसेना-मनसे युती होणार की नाही? राज ठाकरेंचा कार्यकर्त्यांना आदेश;...

0
मुंबई | Mumbai कोणत्याही युती अथवा आघाडीच्या भरवशावर राहू नका, तुम्ही कामाला लागा, असे आदेश राज ठाकरे यांनी मनसे कार्यकर्त्यांना दिले आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर...