Friday, May 3, 2024
Homeमुख्य बातम्यादेवेंद्र फडणवीस घेणार राज ठाकरेंची भेट; चर्चांना उधाण

देवेंद्र फडणवीस घेणार राज ठाकरेंची भेट; चर्चांना उधाण

मुंबई | Mumbai

राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आज मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची भेट आहेत. यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे…

- Advertisement -

देवेंद्र फडणवीस हे राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी भेट घेणार आहेत. सकाळी ११ वाजेदरम्यान ही भेट होईल असे समजते. राज ठाकरे (Raj Thackeray) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची भेट दोन दिवसांपूर्वीच होणार होती मात्र पावसामुळे (Rain) ही भेट रद्द करण्यात आली होती.

राज्यात सत्तांतर झाल्यानंतर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) मुख्यमंत्री बनले तर देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यानंतर राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः एक पत्र लिहिले होते.

त्यावेळी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी आपण स्वतः भेटू असे राज ठाकरेंना सांगितले होते. आता आज या दोन नेत्यांची भेट होणार आहे. या भेटीत कोणती चर्चा होते याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागलेले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या