Friday, May 17, 2024
Homeमुख्य बातम्या...म्हणून उपमुख्यमंत्री झालो; फडणवीस पहिल्यांदाच बोलले

…म्हणून उपमुख्यमंत्री झालो; फडणवीस पहिल्यांदाच बोलले

मुंबई | Mumbai

‘मला दिल्लीतील नेत्यांनी सरप्राईज गिफ्ट दिले, मुख्यमंत्री ऐवजी मला आमच्या नेत्यांनी उपमुख्यमंत्री करून सरप्राईज दिले आहे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी बोलून दाखवत जाहीर सभेत नाराजी व्यक्त केली…

- Advertisement -

राज्यात नुकतेच शिंदे आणि फडणवीस सरकार स्थापन झाले आहे. मुख्यमंत्रिपदाची धुरा न दिल्यामुळे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि भाजपचे (BJP) कार्यकर्ते नाराज झाले होते.

विनायक मेटे (Vinayak Mete) यांचा अभिष्टचिंतन सोहळा आज पार पडला. या सोहळ्याला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) उपस्थित होते. या सोहळ्यात देवेंद्र फडणवीस यांनी हे वक्तव्य केले आहे.

ते म्हणाले की, सर्व आरक्षण घालवायचे काम महाविकास आघाडीने काम केले, आम्ही खुर्च्या तोडण्यासाठी आलो नाहीत. महाराष्ट्रातील महिला ओबीसीच्यामध्ये परिवर्तन करण्यासाठी आलो आहेत. सर्वांना सरप्राईज गिफ्ट मिळेल, असे आश्वासन फडणवीस यांनी दिले. तसेच सर्व घटक पक्षांना सत्तेत वाटा देऊ, असेही ते म्हणाले.

- Advertisment -

ताज्या बातम्या