Sunday, May 5, 2024
Homeनाशिकस्वच्छ सर्वेक्षणासाठी देवळाली कॅन्टोमेंट सज्ज

स्वच्छ सर्वेक्षणासाठी देवळाली कॅन्टोमेंट सज्ज

दे.कॅम्प । वार्ताहर Devlali Camp

स्वच्छ, सुंदर व हरित देवळाली असे ब्रीद मिरवणार्‍या देवळाली कॅन्टोन्मेंट बोर्ड स्वच्छता सर्वेक्षण 2021 मध्ये सहभागी झाले आहे, याच पार्श्वभूमीवर शहरात कॅन्टोन्मेंट प्रशासनाकडून विविध उपक्रम राबविण्यात येत आहे.

- Advertisement -

या सर्वेक्षण दरम्यान नागरिकांनी आपल्या घरातील ओला व सुका कचरा वेगवेगळा करून घंटागाडीत द्यावा तसेच आपल्या घराचा परिसर नेहमी स्वच्छ ठेवावा असे आवाहन आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

मागील वर्षी स्वच्छ सर्वेक्षणात देशपातळीवर देवळाली कॅन्टोन्मेंट 39 व्या स्थानावरून 52 व्या स्थानी घसरण झाली होती. या गोष्टीचे गांभीर्य लक्षात घेत बोर्डाने तातडीने आरोग्य विभागाला आदेश देत सर्व वॉर्डात पुन्हा स्वच्छतेकडे लक्ष देण्याबाबत सूचना केल्या आहेत. आता पुन्हा या सर्वेक्षणात सहभागी होताना प्रशासनाच्या आरोग्य विभागाने नवनवीन संकल्पना शहरात राबविल्या आहे.

आपल्या सर्व अधिकारी कर्मचार्‍यांसह दैनिक कामकाजाव्यतिरिक्त वेगवेगळे उपक्रम राबवित आहे. यामध्ये सिंगल युज प्लास्टिक वापरू नये याकरिता दुकानातून स्टिकर्स देऊन माहिती देत आहे. सार्वजनिक आरोग्य अबाधित राखण्यासाठी शहरातील सर्व सार्वजनिक शौचालयांवर स्वच्छतेचे वेळा, ते काम करणारे कर्मचारी, संबंधित अधिकारी यांचे नावे व संपर्क नंबर रंगवले आहे.

टाकाऊ पासून टिकावू वस्तू बनवून सौंदर्यीकरणात भर टाकली जात आहे. जनजागृती व्हावी या उद्देशाने भिंती रंगविण्यात येऊन त्यावर प्लास्टिक पिशव्या वापरू नका, परिसर स्वच्छ ठेवा, कचरा विलगीकरण, मोकळ्या जागी कचरा पसरविणार्‍यांविरुद्ध कॅन्टोन्मेंट अधिनियम 289 अंतर्गत 2500 रु. पर्यंत दंड आकारणी, स्वच्छता अँप वापर वाढीसाठी जागोजागी याबाबत माहिती प्रदर्शित करणारे फलक व सार्वजनिक तक्रार निवारणासाठी क्यूआर कोडची निर्मिती आदीसारखे नवनवे प्रयोग राबविले जात आहेत. त्यासोबत कार्यालयीन कामात सुसूत्रता व नागरिकांच्या अडचणी तातडीने सोडविण्यासाठी इ- छावणी अ‍ॅपसह जागोजागी क्यू आर कोड प्रदर्शित करण्यात आले आहे.

स्वच्छ सर्वेक्षणासाठी देवळाली सज्ज झाली असून नागरिकांनी या प्रक्रियेत सहभागी होतांना परिसर स्वच्छ ठेवण्यासह इतरांना त्याबाबत प्रोत्साहित करणे आवश्यक आहे.

रजिंदरसिंह ठाकूर, आरोग्य अधिक्षक

- Advertisment -

ताज्या बातम्या