Friday, May 3, 2024
Homeनाशिकमुल्हेरला आषाढी एकादशी निमित्त भाविकांची अलोट गर्दी

मुल्हेरला आषाढी एकादशी निमित्त भाविकांची अलोट गर्दी

नाशिक । Nashik

छत्रपती शिवाजी महाराज (Chhatrapati Shivaji Maharaj) यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या मुल्हेर किल्ल्याच्या (Mulher Fort) पायथ्याशी मुल्हेर गावात वै.काशी राज महाराज यांचे शिष्य वै. परमपूज्य उद्धव महाराज यांची समाधी व विठ्ठल रुक्मिणी मंदिरात (Vitthal Rukmini Temple) भाविकांनी आषाढी एकादशीच्या (Ashadi Ekadashi) निमित्ताने दर्शन घेण्यासाठी अलोट गर्दी केली होती…

- Advertisement -

करोना माहामारीच्या (Corona epidemic) काळात साधारण दोन वर्षे महाराष्ट्रातील सर्वच मंदिरे व धार्मिक स्थळे (Religious places) बंद होती. त्यात मुल्हेर येथील संस्थानही बंद होते. त्यामुळे साधारण मंदिर दोन वर्ष बंद असल्यामुळे भाविकांना (devotees) दर्शन घेता आले नाही. परंतु यावर्षी शासनाच्या आदेशाचे पालन करून मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले. त्यामुळे भाविकांमध्ये आनंदाचे वातावरण होते.

दिवसभरात या मंदिरात साधारण चार ते पाच हजार भाविकांनी दर्शनासाठी हजेरी लावली होती. या मंदिर परिसरातील करंजाडी खोरे व मोसम खोरे (Karanjadi valley & Mosam valley) या परिसरातील भाविक मोठ्या श्रद्धेने आले होते. विशेष म्हणजे मंदिर प्रशासनाकडून आलेल्या भाविकांसाठी उपवासाचे फराळ व चहाचे वाटप ठेवण्यात आले होते.

तसेच आलेल्या भाविकांना करोना या आजाराचे सर्व बंधने पाळणे गरजेचे होते. त्यात सामाजिक आंतर, तोंडाला मास्क, जास्त गर्दी होऊ नये यासाठी मंदिर प्रशासन व ग्रामपंचायत मूल्हेर हे लक्ष देऊन होते. या संस्थेचे बहुतेक बांधकाम हे लाकडी स्वरूपाचे आहे. तसेच मंदिर परिसरात अगदी नयनरम्य चिंचेच्या झाडांचे मोठे पटांगण आहे. या ठिकाणी गावातील किंवा परिसरातील नागरिकांच्या सोयीसाठी प्रशस्त असे मंगल कार्यालय अगदी माफक दरात उपलब्ध आहे. अशा अनेक सोयी सुविधांनी सज्ज असलेले हे देवस्थान असून याच परिसरात वैकुंठवासी ह.भ प.रघुराज महाराज (Raghuraj Maharaj) यांचेही समाधी स्थळ आहे. या स्थळाचेही भाविक आवर्जून दर्शन घेत असतात.

दरम्यान, रघुराज महाराज यांचे सुपुत्र व आत्ताचे मठाधिपती भक्तराज महाराज (Bhaktaraj Maharaj) यांनी म्हटले की, तब्बल दोन वर्षानंतर मंदिरात भाविकांची गर्दी बघून आम्हाला व ग्रामस्थांना मोठा आनंद झाला आहे. यापुढेही गर्दी अशीच राहो हीच सदिच्छा असे त्यांनी सांगितले. तसेच आषाढी एकादशी निमित्ताने या मंदिरात पहाटे काकड आरती, त्यानंतर दुपारी बारा वाजता महाआरती,सायंकाळी हरिपाठ, व सायंकाळी नऊ वाजता ह.भ.प. नितीन महाराज मुडावतकर (Nitin Maharaj Mudawatkar) यांचा जाहीर कीर्तनाचा कार्यक्रम संपन्न झाला.

- Advertisment -

ताज्या बातम्या