Sunday, May 19, 2024
Homeमहाराष्ट्रधनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा - चंद्रकांत पाटील

धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यावा – चंद्रकांत पाटील

पुणे –

धनंजय मुंडेंवरील आरोप गंभीर असून त्यांनी नैतिकता आणि संवेदनशीलता दाखवून समाजिक न्याय राज्यमंत्री पदाचा

- Advertisement -

राजीनामा द्यायला हवा असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.

पुण्यात पत्रकार परिषदेत बोलताना ते म्हणाले,

शरद पवार यांनी त्यांच्या 50 वर्षांच्या राजकीय जीवनात चुकीच्या गोष्टींवरून आजपर्यंत कुणालाही पाठीशी घातलेले नाही. त्यांनी वेळोवेळी अशा घटनांच्या वेळी कठोर भूमिका घेतलेली पाहायला मिळाली आहे. मात्र धनंजय मुंडे यांच्याबाबत मात्र काल झालेल्या बैठकीत पवार यांनी राज्यातील जनतेचा भ्रमनिरास केला आहे. त्यांनी यावेळी रेणू शर्मा यांच्याबाबत पोलीस चौकशीतून जे काही सत्य बाहेर येईल त्यानंतर कारवाई करणार असल्याचे स्पष्ट केले. मात्र एकप्रकारे त्यांना अभय दिले आहे. पण करूणा शर्मा यांच्याबाबत मुंडे यांनी स्वतः जाहीर कबुली देऊन देखील त्यावर शरद पवार यांनी राजीनामा न घेता गप्प का राहिले?

धनंजय मुंडेंवरील आरोप गंभीर असल्याचे शरद पवार यांनी अगोदर एक विधान केले, त्यानंतर घुमजावही केले. मात्र, राज्यातील साडे अकरा कोटी जनता हे सहन करणार नाही. रेणू शर्मांची चौकशी जरूर करा पण करूणाचं काय? ती माहिती इतके दिवस का लपवली. या नैतिकतेच्या मुद्यावरून तरी धनंजय मुंडे राजीनामा देणार की नाही? असा सवालही चंद्रकांत पाटील यांनी केला.

भाजपा महिला मोर्चाचे सोमवारपासून आंदोलन

धनंजय मुंडे यांनी लैंगिक अत्याचारप्रकरणी राजीनामा द्यावा, अशी मागणी आम्ही करत आहोत. मात्र, अद्यापही ते राजीनामा देत नाहीत. या पार्श्वभूमीवर भाजपा महिला मोर्चाच्या माध्यमातून सोमवारपासून राज्यातील जिल्हाधिकारी, तहसील कार्यालयासमोर आंदोलन करणार असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

- Advertisment -

ताज्या बातम्या