Friday, May 3, 2024
Homeनंदुरबाररविवारपासून सुरु होणार होलिकोत्सवाची धूम

रविवारपासून सुरु होणार होलिकोत्सवाची धूम

रविंद्र वळवी

मोलगी | MOLAGI

- Advertisement -

सातपुडयातील (Satpuda mountain) आदिवासी बांधवांचा (Tribal brothers) महत्वाचा सण असलेल्या होलिकोत्सवामुळे (Holikotsav) जिल्हाभरात चैतन्याचे वातावरण आहे. सातपुडा पर्वतात वेगवेगळया दिवशी होळी पेटविली जाते. यंदा उद्या दि. १३ मार्चपासून दाब येथील देवाच्या होळीपासून या होलिकोत्सवाला प्रारंभ होणार आहे. होळीच्या पार्श्‍वभुमीवर आदिवासी बांधव पारंपारिक वेशभुषेच्या तयारीला लागले आहेत. मोरखी अर्थात मोरपिसांच्या टोपला होलिकोत्सवात विशेष महत्व असल्याने सदर टोप बनविण्यासाठी लगबग सुरु आहे.

सातपुड्याच्या दर्‍या-खोर्‍यांच्या पर्वत रांगांमधील गाव पाड्यांना होळी सणाचे वेध लागले आहेत. यासाठी आदिवासी बांधव नियोजन करीत जोरदार तयारीला लागले आहेत.

गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे सण उत्सव शासनाच्या नियमांचे पालन करुन साध्या पद्धतीने साजरे केले जात होते. यंदा होळी हा सण साजरा करण्यासाठी सातपुड्यातील गावपाड्यांवर नियोजन सुरू झाले आहे.

यासाठी होलीकोत्सवात महत्व असलेल्या साधनांची जुळवाजुळव सुरू करण्यात आली असल्याने मागणी असलेले साहित्य बनविण्यात खेड्या पाड्यांवरील कारागीर व्यस्त दिसून येत आहेत.

अककलकुवा तालुक्यातील साकलीउमर (आमराईपाडा) येथे गेल्या एक महिन्यापासून होळी सणासाठी वेगवेगळ्या बावा, नागरा मोरखी, दानखाडोकी, मोरखी वेशभूषा करुन होळीला मानता मानतात आणि आदिवासी भाषेत मोरखी सांगतात.

त्याला लागणारे साहित्य टोपी यांची महत्वाचे असते. या गावातील कारागीर कडक नियम पालन (पालनी) करून घराबाहेर राहून गुरे ढोरे, घरातील माणसे, धान्य यांची चांगले निगा राखावी म्हणून कडक नियम पालन करत गेल्या तीस वर्षांपासून मोर टोपी बनविण्याचे कार्य करीत आहेत. गेल्या पंधरा वीस दिवसापासुन ते या कामासाठी लागलेे आहेत.

या महिन्यात १३ मार्च रोजी दाब (मोरी राही) देवाची होळीपासून सुरुवात होत असल्याने टोपीच्या मागणीनुसार टोपे बनविले जातात.

रमेश वसावे, नारसिंग पाडवी, रायसिंग पाडवी, सुमना पाडवी हे मुख्य कारगीर बनवित असूुन त्याची लहान मुले ही त्यांना मदत करीत असतात. मोर पिसे यांची एक एक कांडी मिळवून एक टोपी बनवणे, एक टोपीला सर्व कारागीर मिळून तयार करायला पाच दिवस लागतात.

तीनशे ते साडेतीनशे कांडी मिळवून एक टोपी बनते. यासाठी अडीचशे ते तीनशे रुपये खर्च करुन एक टोपी तयार करण्यात येत असते. आदिवासी संस्कृतीच्या कलागुणांना वाव मिळत असते. सदर टोपी सातपुडयातील आदिवासी बांधवांचे लक्ष वेधून घेतले.

आदिवासी संस्कृतीचे दर्शन कला, सण, संस्कृती, रुढी, परंपरा, अस्तित्व, चाली रितिरिवाज आज बदलत असताना या रुढी परंपराना आजही महत्व देत मानाचे स्थान कायम आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या