मुंबई | प्रतिनिधी
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या ८० व्या वाढ दिवशी आज विकास आघाडी सरकारचा गेल्या १३ दिवसांपासून रखडलेला खातेवाटपाचा तिढा सुटला त्या अर्थाने उध्दव सरकारने ही पवार यांना दिलेली वाढ दिवसाची भेट ठरली आहे. तर पवार यांचे कट्टर विरोधक म्हणून गेल्या अनेक वर्षापासून भाजपमध्ये बुलंद आवाज काढणारे धुळ्याचे माजी आमदार अनिल अण्णा गोटे यांनी राष्ट्रवादी पक्षात प्रवेश केला त्या अर्थाने पवार यांना ही वाढदिवसांची दुसरी महत्वाची भेट ठरली आहे.
२०१४ मध्ये समृध्दी महामार्गाच्या कामाला प्रत्यक्षात सुरूवात होत असताना गोटे यांनी त्याबाबत जाहीरपणे मते व्यक्त केल्यानंतर त्यांच्यात आणि भाजपच्या नेत्यांमध्ये राजकीय वाद निर्माण झाले होते.
भाजपचे ज्येष्ठ नेते असताना धुळ्यात महापालिका निवडणुखित त्यांना बाजूला ठेवण्यात आल्याने गिरीश महाजन यांच्याशी त्यांचा जाहीर वाद झाला होता. व्यासपिठावर धक्काबुक्की करण्यापर्यंत गोटे यांना भाजपात संघर्ष करावा लागला होता. भाजपने इव्हीएम घोटाळा करून निवडणूकांमध्ये भ्रष्टाचार केल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला होता.
त्यानंतर २०१४ मध्ये पक्षाने त्यांचे तिकीट कापले होते. त्यानंतर त्यानी अपक्ष म्हणून निवडणुका लढवण्याचा प्रयत्न केला त्यात केवळ ३हजार मतांनी त्यांचा पराभव झाला होता. त्यामागे देखीलइवीएन घोटाळा असल्याचा आरोप त्यानी केला होता.
राज्यात उध्दव सरकार सत्तेवर आल्यानंतर भाजपच्या मंत्र्याविरूध्द तसेच मुख्यमंत्र्यांविरोधात भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप त्यानी केले आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीत प्रवेश केल्याने आता राजकीय विरोधकांवर गोटे मोठ्या प्रमाणात हल्लाबोल करण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.